नाशिक – महाराष्ट्र पोलिस अकादमीतील विविध प्रकल्पांचे उदघाटन आज मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थित झाले. या समारंभात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकारी मांढरे यांना उद्देशून काही बाबी सांगितल्या. भारतीय स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९०६ मध्ये महाराष्ट्र पोलिस अकादमीची स्थापना ब्रिटीशांनी पुणे येथे केली. मात्र, ही अकादमी नाशिकला यावी यासाठी नाशिकचे तत्कालिन कलेक्टर (जिल्हाधिकारी) जॅक्सन यांनी कसोशीने प्रयत्न केले. पुण्याहून एखादा प्रकल्प नाशिकला आणणे ही काही सोपी बाब नाही. तेव्हाही आणि आताही. अशा स्थितीतही जॅक्सन यांनी ही अकादमी नाशिकला आणलीच असा उल्लेख करतानाच पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचेही नाव घेतले. मांढरे साहेब तुम्ही ही बाब लक्षात घ्या, असे त्यांनी म्हटल्यानंतर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
या प्रसंगाचा बघा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/ChhaganCBhujbal/videos/381886523347403/