बुधवार, ऑक्टोबर 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एकदा चार्ज केल्यावर १५० किलोमीटर चालणार; जीटी फोर्सच्या ३ स्कूटर लॉन्च

डिसेंबर 28, 2021 | 6:33 pm
in राज्य
0
GT Force Team at Unveiling

 

मुंबई – पर्यावरण अनुकूल पद्धतीने पुढे जाणारी इलेक्ट्रिक वाहन कंपनी असलेल्या जीटी- फोर्सने जीटी ड्राईव्ह, जीटी‌ ड्राईव्ह प्रो आणि इलेक्ट्रिक मोटरसायकल प्रोटोटाईप ह्या तीन इलेक्ट्रिक दुचाकींचे प्रस्तुतीकरण केले. या स्टार्ट अप ईव्ही उत्पादक कंपनीने आकर्षक शैली व उत्तम तंत्रज्ञानाचे उदाहरण दर्शवणा-या उच्च दर्जाच्या ईव्ही उत्पादनांच्या आकर्षक श्रेणीचे प्रस्तुतीकरण केले. जीटी ड्राईव्ह – आधी जीटी‌ ड्राईव्ह आणलेल्या जीटी फोर्सने उच्च गतीचा प्रकार ब्रँडने त्या श्रेणीमध्ये नव्याने आणला आहे. त्यामध्ये ६० किमी प्रति तास ही सर्वोच्च गती मिळते व एका चार्जवर १५० किमी इतके मोठे अंतर पार करता येते. हे उत्पादन हे लिथियम- आयन बॅटरीमध्ये उपलब्ध आहे. त्यासह तीन ड्राईव्ह मोडस मिळतात- इकोनॉमी, स्टँडर्ड आणि टर्बो. स्कूटरमध्ये क्रूझ नियंत्रण प्रणालीसुद्धा उपलब्ध केलेली आहे.

जीटी ड्राईव्ह प्रो- कमी गतीच्या प्रकारातील ही ई- स्कूटर छोट्या अंतरावर प्रवासासाठी सेवा देण्यासाठी बनवण्यात आली आहे. कुटुंब, महिला व मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ह्या उत्पादनामध्ये सर्वांसाठी सुविधा देण्यात आली आहे. एका चार्जवर ती सहजपणे ७५ किमी इतके अंतर पार करू शकते आणि २५ किमी प्रति तास ही‌ तिची सर्वोच्च गती आहे. हे उत्पादन लीड एसिड आणि लिथिअम आयन बॅटरी वर्शन्स ह्या दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे. जीटी- फोर्सचे सह- संस्थापक आणि सीईओ श्री. मुकेश तनेजा यांनी म्हटले, “लोकांचा असा गैरसमज असतो की, ईव्हीज दूर अंतराच्या गरजांची पूर्तता करू शकत नाहीत किंवा त्या पुरेशा सुविधा देऊ शकत नहीत. ह्याचे कारण इतकेच आहे की, त्यांनी आजवर ह्या उत्पादनांचा अनुभव घेतलेला नाही आहे. त्यामुळे ही उत्पादने देशाच्या कानाकोप-यात सगळीकडे उपलब्ध करण्यासाठी आम्ही कठोर मेहनत करत आहोत. व्यापक ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी आमची टीम नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.”

उद्घाटन कार्यक्रमात बोलताना, जीटी- फोर्सचे सह संस्थापक आणि सीओओ राजेश सैत्य यांनी सांगितले की, “भारत हा ईसीईकडून हळूहळू ईव्हीकडे वाटचाल करत आहे. ग्राहकांसाठी गुणवत्तापूर्ण व अफॉर्डेबल अशी उत्पादने उपलब्ध करून आम्ही आमची भुमिका पार पाडत आहोत. आमचे उद्दिष्ट व्यापक राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेची पूर्तता करणे हे आहे व ते करण्यासाठी सर्व ग्राहकांना ईव्ही तंत्रज्ञानाची ओळख करून देणे अनिवार्य आहे. आम्ही आमच्या उत्पादन श्रेणीमध्ये टप्प्या टप्प्याने विस्तार करत आहोत व एक एक प्रकारच्या ग्राहकांच्या प्रवासातील आव्हानांना हाताळत आहोत. आमची कमी गतीची वाहने सहजपणे मुले, महिला व कुटुंबांच्या छोट्या अंतराच्या दररोजच्या प्रवासाच्या गरजांची पूर्तता करू शकतात. एकदा ईव्हीज उपलब्ध झाले की, लोक त्यांची निवड करणे सुरू करतील. परंतु तंत्रज्ञानाची ओळख झाल्यानंतर आणि ते कंफर्टेबल वाटल्यानंतरच ते ईसीईकडून ईव्ही हा बदल करण्याचा निर्णय योग्य माहितीसह घेऊ शकतील.”तसेच, एक्स्पोमधील ऑडियन्ससाठी ब्रँडने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल प्रोटोटाईपचेही अनावरण केले आहे. २०२२ वर्षाच्या दुस-या उत्तरार्धात ही मोटर बाईक बाजारपेठेमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. जीटी- फोर्सने आधीच आपल्या वितरकांचे नेटवर्क देशामध्ये ८० शहरांमध्ये व १०० पेक्षा जास्त वितरकांसह वाढवले आहे. सध्या तिची महाराष्ट्र, कर्नाटका, हरयाना, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानामध्ये विशेष उपस्थिती आहे. सध्याच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस किमान १५० पेक्षा जास्त वितरकांचे तिचे उद्दिष्ट आहे. ब्रँडची शेवटच्या उत्पादनासाठी सध्या बाजारात ७ उत्पादने उपलब्ध आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हवामान विभागाचा इशारा; राज्यातील या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Next Post

नाशिक – जिल्हयात कोरोना रुग्णांची ही आहे संख्या

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, २९ ऑक्टोबरचे रशिभविष्य…

ऑक्टोबर 28, 2025
MOBILE
महत्त्वाच्या बातम्या

रिल बनवला…अपलोड केला… नाशकच्या तरुणाबाबत पुढं एवढं सगळं घडलं…

ऑक्टोबर 27, 2025
IMG 20251027 WA0037
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात प्रथमच लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच मंजुरी आदेश सेवा… या सरकारी योजनेला नवे डिजिटल रूप… नावीन्यपूर्ण उपक्रमाची राज्यभर चर्चा…

ऑक्टोबर 27, 2025
1002726049
महत्त्वाच्या बातम्या

नाशकात रणजी सामन्याचा थरार… बीसीसीआयचे तज्ज्ञ दाखल… या संघांमध्ये रंगणार सामना…

ऑक्टोबर 27, 2025
rainfall alert e1681311076829
मुख्य बातमी

सावधान… चक्रीवादळ येणार… पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज…

ऑक्टोबर 27, 2025
Next Post
carona 11

नाशिक - जिल्हयात कोरोना रुग्णांची ही आहे संख्या

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011