नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – विक्री व सेवा सुविधा नियमांमध्ये सुसूत्रता यावी, यासाठी केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी जीएसटी परिषदेची स्थापना केली होती. त्यामुळे करप्रणालीत अत्यंत सुसूत्रता आली तरी काही उद्योजक, व्यापारी आणि खरेदी विक्री करणारे नागरिक कर भरणा करताना कर चुकविण्याच्या प्रयत्न करतात. त्यामुळे त्यामुळे GST परिषद आता मासिक कर भरणा फॉर्म GSTR-3B मधील बदलांबाबत विचार करत आहे. GST परिषदेची पुढील बैठक 28 ते 29 जून रोजी चंदीगड येथे होणार आहे, यावेळी हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
या बदलामध्ये विक्री रिटर्नशी संबंधित पुरवठा आकडेवारी आणि कर देयकांचा एक स्तंभ समाविष्ट असेल, तो नंतर बदलला जाऊ शकत नाही. तसेच GSTR-3B फॉर्ममधील बदलांमुळे बनावट बिलांना आळा घालण्यास मदत होईल. काही वेळा विक्रेते GSTR-1 मध्ये जास्त विक्री दाखवतात आणि त्यावर आधारित, वस्तू खरेदी करणारा इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) चा दावा करू शकतो. तर GSTR-3B मध्ये कमी विक्री दाखवली तर मुळे GST कमी भरावा लागतो. सध्याच्या GSTR-3B मध्ये, इनपुट टॅक्स क्रेडिटचे तपशील आपोआप तयार होतात.
संबंधित वरिष्ठ अधिकार्यांच्या मते, या बदलामुळे GSTR-3B मध्ये वापरकर्त्याच्या भागाची कमी माहिती असेल आणि फाइल करण्याची प्रक्रिया देखील सुलभ होईल. याबाबत AMRG असोसिएट पार्टनर रजत मोहन यांनी सांगितले की, या बैठकीत प्रवासी वाहतूक सेवा, निवास सेवा, हाउसकीपिंग आणि क्लाउड किचन सेवा प्रदान करणार्या ई-कॉमर्स ऑपरेटर्ससाठी कर फायलिंगमध्ये बदल होऊ शकतात.
दरम्यान, कंपन्या आता पुरवठादारांच्या वतीने त्यांच्या GSTR-1 आणि GSTR-3B मध्ये स्वतंत्र कॉलममध्ये माहिती देण्यास जबाबदार असतील. यामध्ये उबेर, स्विगी आणि झोमॅटो सारख्या कंपन्याही या कक्षेत येतील. यासोबतच परिषद काही कर प्रकरणांमध्ये स्पष्टीकरणही देऊ शकते. यामध्ये मुद्रित माध्यमातील जाहिरातींवर 5 टक्के जीएसटी लागू आहे आणि त्याच आधारावर अन्य स्मरणिकांवरही 5 टक्के कर आकारला जाऊ शकतो.
gst monthly tax return form will change soon tax payment