नवी दिल्ली – केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर भरपाई म्हणून राज्यांना 17,000 कोटी रुपये वितरित केले आहेत. यापैकी महाराष्ट्राला 3,053.59 कोटी रुपये मिळाले आहेत. 2021-22 या वर्षात उपरोक्त रकमेसह आतापर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 60,000 कोटी रुपये जी एस टी भरपाई म्हणून देण्यात आले आहेत. जीएसटी परिषदेच्या निर्णयानुसार, चालू आर्थिक वर्षात जीएसटी भरपाईमधील तुटीच्या बदल्यात 1.59 लाख कोटी रुपयांचे सलग कर्ज आधीच जारी करण्यात आले आहे.