इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तराखंडमधील लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. गंमत म्हणजे इथे लग्नापूर्वीच नवरा आंदोलनाला बसला. तुळशी विवाहापासून जवळपास सगळीकडेच लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. लग्नाचा उत्साह सुरू होतो. सोशल मीडियावर सध्या लग्नाचे जबरदस्त व्हिडीओ दिसत आहेत. वधू-वरांशी संबंधित व्हिडीओ बघण्याची नेटकऱ्यांना आवड असते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. हा व्हिडीओ वेगळाच आहे. कारण इथे नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वीच चक्क आंदोलनाला बसला आहे.
प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, हा व्हिडीओ उत्तराखंडचा आहे. काठगोदाम – हैदाखान रस्ता हा गेल्या महिन्यात दरड कोसळल्याने खचला आहे. रस्त्याच्या बांधणीसाठी स्थानिक जनता आणि काँग्रेस नेते आंदोलन करत होते. दरम्यान, याच रस्त्यावरून वराची मिरवणूक निघाली होती. रस्त्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरू असल्याचे पाहून वराने वधूच्या घरी जाण्याऐवजी तेथेच आंदोलनाला बसणे पसंत केले आणि आंदोलनकर्त्यांसोबत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली.
स्वतःच्याच लग्नाची मिरवणूक सोडून नवरा राजकीय आंदोलनाला बसला आणि हा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत या आंदोलनाला बसणार असल्याचे त्याने ठणकावले. काँग्रेस नेते यशपाल आर्य यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या अनोख्या व्हिडीओला शेकडो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने म्हटले आहे की, ‘भाऊ, तुम्ही जर आंदोलनाला बसलात तर लग्न चुकेल.’ तर दुसरा म्हणतो, ‘याने तर लग्नाआधीच विरोध करायला सुरुवात केली…’ आपले लग्न खास बनवण्यासाठी काय करतील याचे लोकांना भान नाही, असेही या अनेकांनी म्हटले आहे.
कोटाबाग से पतलिया जाने वाली एक बारात को पैदल सफर तय करना पड़ा, दूल्हे राहुल अपनी दुल्हन को लेने क्षतिग्रस्त मार्ग से पैदल पतलिया क़े लिये निकले ,दूल्हे राहुल भी कांग्रेस के उपवास को समर्थन देने के लिए धरना स्थल पर पहुँचे।@INCIndia @devendrayadvinc @INCUttarakhand pic.twitter.com/GnC3zW45ZD
— Yashpal Arya (@IamYashpalArya) December 6, 2022
Groom Sat for Agitation Viral Video Demand