नाशिक – जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळवून देत. त्यांना दिलासा मिळवून द्यावा असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ग्रामीण पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी,चांदवड, निफाड व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत परिस्थिती समजून घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आदेश दिले आहेत.








