इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काही दिवसापूर्वी एका समाजशास्त्रज्ञाने भारतीय समाजातील लोक हे विकृत मनोवृत्तीकडे जात असल्याचे म्हटले होते, त्याची प्रचिती आताच्या काळात वारंवार येत आहे, याला कारण सध्या गुन्ह्यांच्या विविध विचित्र घटना उघडकीस येताना दिसत आहेत. श्रद्धा वालकर हत्या प्रकरण, सरस्वती वैद्य हत्या प्रकरण ही त्याची काही उदाहरणे आहेत. अशात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. एक ६५ वर्षी आजी तिच्या नातवाच्या मृतदेहासह दहा दिवस राहात होती इतकेच नव्हे तर त्या मृतदेहाला अंघोळही घालत होती, अशी घटना समोर आली आहे. चार दिवसांनी शेजाऱ्यांना दुर्गंधी येत होती पण त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र जेव्हा आठ दिवसात ही दुर्गंधी वाढली, तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी आले तेव्हा हा भयंकर प्रकार उघडकीस आला.
…म्हणून झाले उघड
उत्तर प्रदेशातील बाराबंकी भागात ही धक्कादायक घटना घडली असून वृद्ध महिलेच्या घरात सापडलेला मृतदेह तिचा नातू प्रियांशू याचा आहे. प्रियांशूच्या आई-वडिलांचे आधीच निधन झाल्याने त्याचा सांभाळ आजी करत होती. आहे. यानंतर नुकताच प्रियांशूचाही मृत्यू झाला, मात्र तो कसा काय झाला ? हे अद्याप कळालेले नाही. वृद्ध महिलेसोबत तिचा १८ वर्षांचा नातू प्रियांशू राहात होता. वृ्द्ध महिलेच्या घरातून गेल्या अनेक दिवसांपासून दुर्गंधी येत होती. यामुळे शेजारी तक्रारीही करत होते. या तक्रारीनंतर शेजाऱ्यांना संशय झाला आणि त्यांनी पोलिसांकडे याबाबतची तक्रार दाखल केली. शेजाऱ्यांच्या तक्रारी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी दरवाजा उघडताच त्यांना मोठा हादराच बसला. कारण वृद्ध महिला ही तिच्या नातवाच्या मृतदेहाला अंघोळ घालत होती. या नातवाचा मृतदेह पूर्णपणे सडला होता, तसचे त्यामधून किडे देखील बाहेर पडत होते आणि दुर्गंधी येत होती. त्यामुळे सर्वांनी नाकाला रुमाल लावला.
मृत्यूचे कारण
वृद्ध महिला आपल्या नातवासोबत घरात एकटीच राहत होती, घराला नेहमी आतून कुलुप लावलेले असे, त्यामुळे आजीबाई आणि तिचा नातू नेमके काय करतात, हे कुणालाही कळत नसे. ही वृध्द महिला तिच्या नातवाच्या मृतदेहासह राहात होती. या मृतदेहाला रोज अंघोळ घालत होती. खरे म्हणजे नातवाचा पूर्णपणे मृतदेह सडला होता. शेजाऱ्यांनी या आजींचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे सांगितले मात्र या मुलाचा मृत्यू कसा झाला ते समजू शकलेले नाही. पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शव विच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या मुलाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेने गावात खळबळ उडाली आहे