मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीतील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती, राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली.
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र २५ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ३ मे २०२३ रोजी होईल.
नामनिर्देशनपत्रे ८ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. १८ मे २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १९ मे २०२३ रोजी होईल.
? बंपर जॅकपॉट!
*CRPF मध्ये तब्बल १.३० लाख पदांची भरती*
या उमेदवारांना संधी
https://t.co/NAa9iLavPx#indiadarpanlive #crpf #bumper #recruitment #1lakh #post #vacancy #job— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 6, 2023
? सावधान!
*अवकाळी वातावरणासहित गारपीटीची शक्यता;*
हवामान विभागाचा इशारा
https://t.co/K3aA9bblAr#indiadarpanlive #alert #weather #forecast #rainfall#hailstorm— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 6, 2023
Grampanchayat Sarpanch Bypoll Election Declared