अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतीसाठी निवडणुकांचे मतदान आज पार पडले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवार निवडून यावे यासाठी मतदारांना विनंती करीत असतो. नांदगाव तालुक्यातील हिंगणवाडी येथे आज मतदान झाले यावेळी ११० वर्षाच्या गजाबाई काळू आयनोर या आजीने आपला मतदानाचा हक्क बजावला. या वयात आजीने आपल्या मतदानाचा हक्क बाजावल्याने सर्वांनीच आजीचे कौतुक केले.