मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अधीक्षक, डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील 67 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 5 जून 2022 पर्यंत व त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, नवी मुंबई विभाग यांनी केले आहे.
https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येतील. अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश: आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच अर्जदाराला अर्जाचे शुल्क प्रधान डाकघर, पनवेल-410206 येथे जमा करता येईल.
टपाल विभाग उमेदवारांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी पत्रव्यवहार केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इतरांसमोर उघड करु नयेत आणि अनधिकृत दूरध्वनी संदेशापासून सावध रहावे. अधिक माहितीसाठी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे