बुधवार, नोव्हेंबर 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ग्राहक आणि Consumer यात काही फरक आहे का?

एप्रिल 24, 2021 | 12:43 am
in इतर
0
EdY7fqTUEAABQO2

ग्राहक आणि Consumer यात काही फरक आहे का?

ग्राहक म्हणजे जो ग्रहण करतो तर consumer म्हणजे जो consume करतो….. आपण या विदेशी मॉल संस्कृती मधे अडकू नका. करोना मुळे आपण आता ओळखले आहे की आपल्या गरजा फार कमी आहेत आणि चैनी जास्त आहेत त्यामुळेच चिनी सामान आपण घेत आहोत.
खालील गोष्टीवरून आपण स्वतः विचार करा :
ही १७६५ सालची गोष्ट डेनिस डिडरोट आतापर्यंत ५२ वर्षाचा झाला होता. त्याने खूप जास्त पुस्तके वाचलेली होती आणि जणू त्याची लायब्ररीच त्याच्याकडे होती. तरी त्याने त्याचे पूर्ण आयुष्य गरिबीत काढलेले होते. त्याच्या मुलीच्या लग्नासाठीसुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते.
एकेदिवशी रशियाची त्यावेळेची राणी कँथरीनला डिडरोटच्या ह्या गरिबीबद्दल माहित झाले. तिने डिडरोटला त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी १००० GBP, म्हणजेच ५० हजार डॉलर्स किंवा आताचे जवळपास साडेतीन करोड रुपये डिडरोटला देऊ केले. आणि डेनिस डिडरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला.
त्याने लगेच त्या पैशातून “स्कार्लेट रॉब” म्हणजे एक उच्च्प्रतीचा सदरा विकत घेतला जो अतिशय महागडा होता. हा सदरा वापरत असतांना त्याला अचानक जाणवले की आपण घालतोय अतिशय उच्चप्रतीचा सदरा आणि आपल्या घरात त्याच उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या, किचन रूममधल्या वस्तू बदलल्या, फर्निचर बदलले आणि अशा सगळ्या नवीन वस्तू विकत घेतल्या ज्यामुळे आता पूर्ण घर आणि सदरा एकमेकांना शोभून दिसत होते.
परंतु हे सगळे करण्यामध्ये तो पूर्णतः कंगाल झाला आणि त्याच्या नावावर असलेले कर्ज जास्तच वाढून गेले. त्याने हे सगळे दुखः कष्टाने सहन केले आणि हे सगळे आपल्या एका निबंधांत नमूद करून ठेवले.
ह्याला मानसशास्त्रात “डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)” म्हणतात. मोठ्या कंपन्या, विक्रेते, डेव्हलपर्स ह्या इफेक्टचा वापर छुप्या पद्धतीने करतात.
तुम्ही ३०००० हजाराचा मोबाईल घेणार. मग तुम्हाला काहीतरी कमी वाटेल मग तुम्ही अजून ५०० रुपयाचा गोरील्ला ग्लास लावणार. ५००-६०० रुपायचे महिन्याला कव्हर बदलणार. जिथे ५०० रुपयाचा हेडफोन कामी आला असता तिथे ३००० चा हेडफोन घेणार कारण तो मोबाईलला जास्त शोभून दिसेल. एखादा निळ्या रंगाचा मस्त शर्ट घेतला की त्याला मेचींग असलेले घड्याळ, किंवा पँट घेणार.
घरी मस्त मोठा टिव्ही आणला की चांगला टेबल आणणार, त्याला टाटा स्काय लावणार, HD वाहिन्या सुरु करणार. रंग चांगला लावला की खिडकीला परदे लावणार, सजावट करणार.
डिडरोट इफेक्ट एका वाक्यात थोडक्यात सांगायचा झाला म्हणजे : “एक नवीन वस्तू विकत घेतली असता तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआप कमी होतो आणि तो वाढविण्यासाठी आपल्या हातून नकळतपणे जास्त खर्च होतो.”
तुम्हीच पहा, सगळे विक्रेते छुप्या पद्धतीने डिडरोट इफेक्टचा वापर करतात. एक साधा चहा वाला तुम्हाला चहासोबत सिगारेट देऊ का विचारतो? SIM विकणारा ३ किंवा ४ महिन्याचे packs टाकून द्यायचे म्हणतो, एक laptop विकत घेतांना त्यासोबत २-३ हजाराचा antivirus टाकून मिळतो. लिंबू, आद्रक, टमाटे घेतल्यावर तुम्हाला म्हटले जाते “आहे मिरची पण घ्या की!!”. भांडे घेतल्यावर त्याच्यावर ५० रुपयात नाव कोरून मिळते, झाडं विकत घेतली की १०० रुपयाला त्याच खत मिळते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.
आपण घेतो एक वस्तू आणि दुसऱ्या वस्तू आपोआप घ्यावेसे वाटतात भले त्यांची गरज आपल्याला नको. आणि अशा पद्धतीने आपण एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारसे महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू त्या पण गरज नसतांना घेऊन टाकतो. आणि आपल्याला कळतसुद्धा नाही. ह्याला “spiraling consumption” म्हणतात म्हणजे एकामुळे दुसऱ्या अनेक गोष्टी गरजेचे वाटणे आणी विकत घेतल्या जाणे.
लक्षात ठेवा, हा “डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)”!!
ही मानवी मनाची वागणूक आहे, ह्युमन टेन्नडन्सी!! आणि ह्याला थांबवले जाऊ शकते. ह्याचे परिणाम भयानक आहेत का?? मी सांगेल जास्त भयानक आहेत. कारण परिणाम उघड्या डोळ्यांनी नाही दिसत. आपण नकळतपणे अनावश्यक खर्च करतच जातो आणि खूप उशिरा लक्षात येत हे सगळे.
माणसाला खर्च करण्याची भीती वाटत नाही. त्रास होतो तो हिशोब न लागण्याचा!! – व.पु.काळे
तुम्हीच स्वतःला प्रश्न विचारायचा. “मला ह्या वस्तूची खरच गरज आहे का?” उत्तर हो आले तर आहे त्या किमतीत न घेता रिसनेबल किमतीत वस्तू शोधावी.
वस्तूंची उपयोगिता किती त्यानुसार त्यांना विकत घ्यायचे, ना की स्वतःचे ते किती स्टेटस वाढवतील त्यामुळे.
समोरच्याने दुसरी वस्तू दाखवली तरी भान विसरायचे नाही. लक्षात ठेवायचे की, “वस्तू मस्त, भारी वाटली तरी तिचा तुमच्या आनंदाशी आणि उपयोगितेशी काडीचा संबंध नाही.” आनंद वाटत असला तरी तो क्षणिक असतो. कालांतराने आनंद जातो आणि पैसेसुद्धा!!
“डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)”!!
तुमच्या माहितीतील असा एखादा सिद्धांत (थेअरी) सांगू शकता का ज्याचे परिणाम खूप भयानक होते / आहेत?
माहिती संदर्भ :
Understanding the Diderot Effect (and How To Overcome It)
Source – Quara
(अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या नाशिक शाखेच्यावतीने प्रबोधनार्थ लेख)
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजचे राशिभविष्य – शनिवार – २४ एप्रिल २०२१

Next Post

आली ही अनोखी सायकल; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
16 04 2021 e bike 21564142

आली ही अनोखी सायकल; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011