नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडीच्या नाशिक पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी चार वाजता राष्ट्रवादी भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शुभांगी पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आज सायंकाळी ४ वाजता राष्ट्रवादी भवन येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सर्व पदवीधरांनी व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
Graduate Constituency NCP Meeting Tomorrow