विशेष प्रतिनिधी, मुंबई
सूर्यावरून उठलेले सोलर स्टॉर्म जवळपास ताशी १ लाख ६० हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हे वादळ पृथ्वीला धडकण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. स्पेसवेदर या संकेतस्थळाने दिलेल्या एका माहितीनुसार हे स्टॉर्म पृथ्वीवर आदळल्यानंतर कुणाच्याही जीवाला धोका होणार नाही, तर अत्यंत आल्हाददायक किरणांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. हा प्रकाश उत्तर किंवा दक्षीणेकडे राहणाऱ्या लोकांना रात्री बघायला मिळणार आहे. मात्र हे वादळ जीपीएस, मोबाईल, सॅटेलाईट टीव्ही, रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणारे उपकरण आदींवर परिणाम करू शकतात.
पृथ्वीची एक मॅग्नेटिक कक्षा तयार करण्यात आली आहे. ही कक्षा सूर्यावरून निघणाऱ्या धोकादायक किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करते. एखादे वेगवान किरण पृथ्वीच्या दिशेने आले तर मॅग्नेटिक कक्षा त्याला रोखते. अशी किरणे येताना दिसली की मॅग्नेटिक फिल्ड कांद्याच्या छिलट्यांप्रमाणे उघडायला लागते. असे जवळपास ६ ते १२ तास चालते.








