मुंबई – केंद्र आणि विविध राज्यांमध्ये अनेक विभागांमध्ये रिक्त पदे असल्याने नोकरभरती सुरू आहे. त्याचप्रमाणे लष्करी विभागात तसेच टपाल खात्यात देखील रिक्त जागांसाठी भरती सुरू आहे. विशेष म्हणजे लष्करातील एका पदावर नोकरीसाठी 1 लाख 77 हजारांचे वेतन उमेदवाराला मिळू शकते. भारतीय लष्करात शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या वतीने लष्कर जज अॅडव्होकेट जनरलच्या जागेसाठी लॉ ग्रॅज्युएट्सकडून अर्ज मागवत आहे. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 आहे. या भरती रिक्त पदांची एकूण संख्या 7 असून वेतन 56 हजार ते 1 लाख 77 हजार रुपये इतके आहे. यासाठी उमेदवाराकडे एलएलबी पदवीमध्ये किमान 55 टक्के एकूण गुण असणे आवश्यक आहे. तसेच वयोमर्यादा 21 ते 27 वर्षे आहे. इच्छुक उमेदवार joinindianarmy.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच अधिक तपशीलांसाठी उमेदवार या थेट लिंकवर क्लिक करून अधिसूचना वाचू शकतात.
त्याचप्रमाणे इंडिया पोस्ट संस्थेमध्ये दोनशेहून अधिक पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. पोस्टमॅन, पोस्टल असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना आमंत्रित केले जाते. अधिसूचनेनुसार, दिल्ली सर्कलसाठी भरती मोहिमेद्वारे, पोस्टात अनेक वेगवेगळ्या पदांसाठी सुमारे 221 रिक्त जागा भरण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजे 4 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होईल. तसेच 12 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येईल.