पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात अनेक तरुणांना नोकरीची गरज असते. शासकीय नोकरीत संधी उपलब्ध झाली आहे. याचा तरुणांना लाभ घेता येऊ शकतो. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटेशन डेव्हलपमेंट (CDAC), हैदराबादच्या कार्यालयात विविध पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
केंद्राने दिलेल्या जाहिरातीनुसार प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प प्रमुख/मॉड्युल लीडर/वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता या एकूण ५४ जागांसाठी पात्र उमेदवार आणि प्रोजेक्ट असोसिएटसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १५ मार्चपासून सुरू झाली असून उमेदवार ३० मार्चपर्यंत अर्ज सादर करू शकतील.
भरतीसाठी अर्ज कसा करावा : इच्छुक उमेदवारांना cdac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि नंतर करिअर विभागात जावे लागेल आणि त्यानंतर उमेदवारांना सध्याच्या नोकरीच्या संधींमध्ये दिलेल्या संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर उमेदवार संबंधित भरती जाहिरातीसह ऑनलाइन अर्जाची लिंक पाहू शकतील. उमेदवारांना अर्ज करायच्या पदासाठी ‘तपशील’ या लिंकवर क्लिक करून अर्ज पृष्ठावर जावे लागेल, जेथे उमेदवार आवश्यक तपशील भरून अर्ज सबमिट करू शकतील.
पदानुसार रिक्त पदांची संख्या :
प्रकल्प व्यवस्थापक (IoT Sec) १ पद
प्रकल्प व्यवस्थापक (FSP) – १ पद
प्रकल्प अभियंता (DDUB) – ६ पदे
प्रकल्प अभियंता (SD) – ३ पदे
प्रोजेक्ट असोसिएट (SD) – २ पदे
प्रकल्प अभियंता (टेक) – १ पद
प्रकल्प अभियंता (सामग्री BL) – १ पद
प्रोजेक्ट लीडर (सामग्री BL) – १ पद
वरिष्ठ प्रकल्प अभियंता (HSN) ३ पदे
प्रकल्प अभियंता (CS) – ७ पदे
मॉड्यूल लीडर (CS) – २ पदे
प्रकल्प अभियंता (MDP) – २ पदे
प्रकल्प अभियंता (DDQC) – ३ पदे
प्रकल्प अभियंता (IoT Sec) – १ पद
प्रोजेक्ट असोसिएट (IoT Sec) १ पद
प्रकल्प अभियंता (VLSI) – २ पदे
प्रकल्प अभियंता (ISS) – १५ पदे
वरिष्ठ प्रकल्प अभियंता (ISS) – ३ पदे