नवी दिल्ली – सध्याच्या काळात प्रत्येक तरुण नोकरी शोधत असतो, अशा परिस्थितीत विविध सरकारी विभागांमध्ये नोकर भरती अधिसूचना जारी केली आहे. थोड्या जिद्दीने अभ्यास केला, तर सरकारी नोकरी मिळू शकेल. नोकरीची योग्य संधी शोधणे महत्त्वाचे आहे. परंतु सरकारी नोकरीची सुवर्ण संधी कोठे, केव्हा आहे, हे जाणून घेऊ या…
१) कार्यकारी व व्यवस्थापकांची १०७४ पदे रिक्त
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (डीएफसीसीआयएल) अधिकृत संकेतस्थळावर एक अधिसूचना जारी केली असून एकूण १०७४ पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. भरती प्रक्रियेद्वारे कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी आणि कनिष्ठ व्यवस्थापक या पदांसाठी अर्जदारांची भरती होईल. २४ एप्रिलपासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार डीएफसीसीआयएल https://dfccil.com/ च्या अधिकृत वेबसाइटवर २३ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
२) ओएमसीच्या या पदांवर भरती :
ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएमसी लिमिटेड) यांनी कार्यकारी पदांच्या भरतीबाबत अधिसूचना जारी केली आहे. भरती प्रक्रियेद्वारे अर्जदारांना उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी भरती केली जाईल. इच्छुक उमेदवार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे निश्चित करण्यात आली आहे.
उपव्यवस्थापक (कार्मिक) – ३ पदे
उपव्यवस्थापक (वित्त) – ३ पदे.
व्यवस्थापक वन आणि पर्यावरण – २ पदे
वैद्यकीय अधिकारी – २ पदे
उपमहाव्यवस्थापक (खाण) – १ पद
वरिष्ठ व्यवस्थापक (खाण) – १ पद
उपमहाव्यवस्थापक (कायदेशीर) – १ पद