नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हनुमाजन्मस्थळावरुन आयोजित शास्त्रर्थ सभेत मोठा गोंधळ झाला. या सभेनंतर गोविंदानंद महाराज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध बाबींचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, मी कोणाच्याही बाजूने अथवा विरोधात नाही. हनुमान जन्मतिथी आणि जन्मभूमीकडे कल्पभेदाने पाहावं लागेल. नाशिकमध्ये येवून आनंद वाटला. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
आपण सर्व एक आहोत. हनुमान एक आहे आणि जन्मस्थळही एक आहे. हे एकत्व महत्त्वाचे आहे. वर्तमान कल्पात किष्किंधाच हनुमानाची जन्मभूमी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शास्त्रार्थ सभेत मोठा गोंधळ झाला. हनुमानाचे जन्मस्थळ हे अंजनेरी नाही, असा दावा गोविंदानंद यांनी केला आहे. ब्रह्म पुराणानुसार अंजनेरी ही हनुमान जन्मभूमी असल्याचे मानण्यास गोविंदानंद यांनी नकार दिला आहे. मी आता येथून गुजरातकडे प्रयाण करीत असल्याचे त्यांंनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून हनुमान जन्मस्थळ हे चर्चेला आले आहे.