मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंदूक साफ करत असताना अभिनेता गोविंदाच्या हातून चुकून गोळी सुटल्यामुळे ती पायाला लागल्याने तो जखमी झाला आहे. गोविंदा यांच्यावर क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॅास्पिटल प्रशासनाने सांगितले.
दरम्यान गोविंदा यांचे मॅनेजर शाही सिन्हा यांनी गोविंदा पहाटे कोलकात्याला जाणार होते. ते त्यांची तयारी करत होते. त्याचवेळी त्यांच्याकडे असलेली बंदूक कपाटात ठेवत होते. तेव्हा ती बंदूक त्यांच्या हातून खाली पडली आणि गोळी लागली.
तर गोविंदाने सुध्दा या घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे. आई वडिलांचा आशीर्वाद आणि गुरुंच्या कृपेमुळे मी सुरक्षित आहे. मला गोळी लागली होती. ती आता काढण्यात आलेली आहे.