इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोलापूर जिल्ह्यातील सासूरे गावात नर्तकीच्या घरासमोर आपल्या गाडीत बसून बीडच्या गेवराई तालुक्यातील लुकामसला गावतल्या उपसरपंच गोविंद बर्गे स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर खळबळ निर्माण झाली. मात्र आता हा प्रकार घातपात असल्याचा आरोप उपसरंपचाच्या भाज्याने केला आहे.
बर्गे यांच्या भाज्याने सांगितले माझ्या मामाकडे पिस्तूल नव्हती, मामा निर्व्यसनी होता. या घटनेतून बदनाम करण्यात येत आहे. हा घातपात असल्याचेही त्याने सांगितले. मामा गेल्या सहा महिन्यापासून तणावात होता. ही महिला ब्लॅकमेल करत होती.
दीड वर्षापूर्वीची ओळख..
गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत दीड वर्षापूर्वी ओळख झाली. त्यानंतर त्याचे प्रेमसंबधात रुंपातर झाले. त्यानंतर गोविदं यांच्याकडून या महिलेने पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर तीन गेवराई येथील बंगला माझ्या नावावर आणि भावाच्या नावावर पाच एकर शेती करा असा हट्ट धरला. मागणी मान्य न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली.