मुंबई – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष दिसून येत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा तीन पक्षांची सध्या राज्यात सत्ता आहे. तर, राज्यपाल हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळेच या दोघांमध्ये मोठे द्वंद सुरू आहे. मंत्रिमंडळाने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ सदस्यांची नावे राज्यपालांना दिली आहेत. त्यास वर्ष झाले तरी राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक असो की राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न यात दोघेही आमने सामने आले आहेत. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेले पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. या संघर्षात नक्की कोण जिंकले असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. बघा हा व्हिडिओ