नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे नाशिकच्या दौऱ्यावर येणारर आहेत. उद्या, बुधवार, २६ एप्रिल रोजी त्यांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे. राज्याच्या राज्यपाल पदाची सूत्रे घेतल्यानंतर बैस हे प्रथमच नाशिकला येत आहेत.
राज्यपाल रमेस बैस हे बुधवार, २६ एप्रिल रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यावेळी राज्यपाल त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत. तेथे ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पहिणे तालुका त्र्यंबकेश्वर या आदिवासी गावास भेट देणार आहेत. तेथे ते आदिवासी बांधवांशी संवाद साधणार आहेत. तसेच, नाशिक शहरात ते येणार आहेत. कालिदास कलामंदिर आणि सार्वजनिक वाचनालय येतील कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय ते श्री काळाराम मंदिरात जाऊन प्रभु श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत.
राज्यपालांच्या दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. तसेच, सुरक्षेचा मोठा बंदोबस्त बुधवारी राहणार आहे. या दौऱ्यात कुठलाही हलगर्जीपणा होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी स्वतः याकडे जातीने लक्ष देऊन आहेत.