नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल रमेश बैस यांचा नाशिक आणि अहमदनगर जिल्हा दौरा अचानक रद्द झाला आहे. आजपासून ते दौऱ्यावर येणार होते. दोन दिवसांचा हा दौरा होता. मात्र, राजभवनाकडून दौरा रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाला कळविण्यात आले आहे. मात्र, हा दौरा अचानक का रद्द झाला याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे उलटसुटल चर्चा सुरू आहे.
नियुक्तीनंतर पहिलाच दौरा
राज्याच्या राज्यपाल पदाची सूत्रे बैस यांनी गेल्या महिन्यात स्वीकारली. त्यानंतर ते पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर होते. त्यात सर्वप्रथम नाशिक-नगरची निवड करण्यात आली होती. राज्यपालांचा जवळपास पूर्ण दौरा धार्मिक स्वरुपाचा होता. त्यात देवदर्शन होते. त्याचबरोबर काही कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत.
नक्की कारण काय
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे निधन झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे राज्यपालांनी दौरा रद्द केल्याचे एक कारण दिले जात आहे. तर, सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथील त्यांच्या गावी गेले आहेत. ते तीन दिवसांच्या रजेवर असल्याचे बोलले जाते. तसेच, राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सरकार बदलाच्या आणि मुख्यमत्री बदलाच्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळे या राजकीय हालचालींमुळे राज्यपालांचा दौरा रद्द झाला का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
असा होता नाशिक दौरा
राज्यपाल हे बुधवार, दिनांक 26 एप्रिल, 2023 रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येतील. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दर्शन, पहिने तालुका त्र्यंबकेश्वर या आदिवासी गावास भेट, कालिदास कलामंदिर, सार्वजनिक वाचनालय व काळाराम मंदिर, नाशिक या ठिकाणी त्यांचे नियोजित कार्यक्रम होते.
असा होता नियोजित नगर दौरा
बुधवार 26 एप्रिल, 2023 रोजी सायंकाळी 4.45 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, नाशिक येथून हेलिकॉप्टरने शिर्डीकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 वाजता श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड, शिर्डी येथे आगमन. शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे आगमन व राखीव. श्री साईबाबा मंदिर शिर्डी येथे शेज आरतीस उपस्थिती. शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे भोजन , राखीव व मुक्काम. गुरुवार दिनांक 27 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता शासकीय विश्रामगृह शिर्डी येथून श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड शिर्डीकडे प्रयाण. सकाळी 9.25 वाजता श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड शिर्डी येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड येथुन हेलिकॉप्टरने देवगड ता. नेवासाकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता देवगड हेलिपॅड ता. नेवासा येथे आगमन. सकाळी 10.05 वाजता देवगड हेलिपॅड येथून मोटारीने श्री दत्त मंदिर संस्थान देवगडकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता श्री दत्त मंदिर संस्थान देवगड ता. नेवासा येथे आगमन.
सकाळी 10.15 ते दुपारी 12.15 वाजता श्री दत्त मंदिर संस्थान देवगड ता. नेवासा येथे राखीव. दुपारी 12.15 वाजता श्री दत्त मंदिर संस्थान देवगड येथून हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 12.25 वाजता हेलिपॅड देवगड ता. नेवासा येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वाजता हेलिपॅड देवगड येथून हेलिकॉप्टरने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकडे प्रयाण. दुपारी 1.05 वाजता महात्मा फुले कृषी विद्यापीठ हेलिपॅड राहुरी येथे आगमन. माध्यान्न भोजनाकरीता राखीव. दुपारी 3 ते 4.30 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथिल कार्यक्रमाकरीता राखीव. दुपारी 4.30 वाजता हेलिपॅड महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.
Governor Ramesh Bais Nashik Nagar Tour Suddenly Cancelled