अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस हे दि. 26 व 27 एप्रिल 2023 रोजी अहमदनगर जिल्ह्यात दौ-यावर येत आहेत. यात ते बहुतांश धार्मिक ठिकाणांना भेटी देणार आहेत. प्रशासनाने या दौऱ्याची जय्यत तयारी केल आहे.
राज्यपालांचा नगर दौरा पुढीलप्रमाणे
बुधवार 26 एप्रिल, 2023 रोजी सायंकाळी 4.45 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, नाशिक येथून हेलिकॉप्टरने शिर्डीकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 वाजता श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड, शिर्डी येथे आगमन. शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे आगमन व राखीव. श्री साईबाबा मंदिर शिर्डी येथे शेज आरतीस उपस्थिती. शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे भोजन , राखीव व मुक्काम.
गुरुवार दिनांक 27 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता शासकीय विश्रामगृह शिर्डी येथून श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड शिर्डीकडे प्रयाण. सकाळी 9.25 वाजता श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड शिर्डी येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड येथुन हेलिकॉप्टरने देवगड ता. नेवासाकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता देवगड हेलिपॅड ता. नेवासा येथे आगमन. सकाळी 10.05 वाजता देवगड हेलिपॅड येथून मोटारीने श्री दत्त मंदिर संस्थान देवगडकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता श्री दत्त मंदिर संस्थान देवगड ता. नेवासा येथे आगमन. सकाळी 10.15 ते दुपारी 12.15 वाजता श्री दत्त मंदिर संस्थान देवगड ता. नेवासा येथे राखीव. दुपारी 12.15 वाजता श्री दत्त मंदिर संस्थान देवगड येथून हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 12.25 वाजता हेलिपॅड देवगड ता. नेवासा येथे आगमन व राखीव.
दुपारी 12.30 वाजता हेलिपॅड देवगड येथून हेलिकॉप्टरने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकडे प्रयाण. दुपारी 1.05 वाजता महात्मा फुले कृषी विद्यापीठ हेलिपॅड राहुरी येथे आगमन. माध्यान्न भोजनाकरीता राखीव. दुपारी 3 ते 4.30 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथिल कार्यक्रमाकरीता राखीव. दुपारी 4.30 वाजता हेलिपॅड महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.
Governor Ramesh Bais Ahmednagar 2 Day Visit