नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी गप्प राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मोठी चर्चा आहे. मराठी माणसासंदर्भातील त्यांच्या वक्तव्याची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. येथे आज महाराष्ट्र सदनामध्ये आज झालेल्या कार्यक्रमादरम्यान कोश्यारी यांनी प्रसारमाध्यमांना पाहून पाठ फिरवली. त्यामुळेच ही चर्चा सुरू झाली आहे. कोश्यारी यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असली तरी भाजप नेते कुठलाही धोका घेऊ इच्छित नाहीत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर भाजप आता एकेक पाऊल पुढे टाकत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सध्या दिल्लीत आहेत. महाराष्ट्र सदनात त्यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी मीडियापासून अंतर ठेवले. कोश्यारी म्हणाले की, मी काही बोलणार नाही. इथे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी बोला. मला बोलायचे नाही. राज्यपालांना न बोलण्याचे आदेश देण्यात आल्याचेही कोश्यारी म्हणाले. कोश्यारी यांच्या या वक्तव्यावरून पक्षाने त्यांना तोंड बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने त्यांना असे बोलण्यापासून कोणी परावृत्त करू शकेल का, असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.
https://twitter.com/micnewdelhi/status/1556137415047544833?s=20&t=CoXGdUyYHXdkQnl4x-AWTA
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते. गुजराती आणि मारवाडी सोडल्यास मुंबई आर्थिक राजधानी होणार नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे भाजपची कोंडी झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सेना बंडखोरांनी कोश्यारी यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर केले. त्यानंतर कोश्यारी यांना माफी मागावी लागली. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाला राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे, असे ते म्हणाले.
https://twitter.com/MahaGovtMic/status/1556146542809325568?s=20&t=CoXGdUyYHXdkQnl4x-AWTA
त्यातच शिवसेनेतील अंतर्गत वादासह नव्या सरकार स्थापनेचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे यासंदर्भातही भाजप पक्षश्रेष्ठी अधिक सजग आहेत. याप्रकरणी कुठलाही वाद निर्माण होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच सावधानतेने सर्व पावले टाकली जात आहेत.
Governor Bhagat Singh Koshyari Kept Silence BJP Politics New Delhi Visit