मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल रमेश बैस यांनी विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या नावाची घोषणा केली आहे. राजभवनाकडून तशी माहिती देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या नियुक्तीची प्रतीक्षा होती. अखेर आता कुलगुरु जाहीर करण्यात आले आहेत.
राजभवनाकडून नुकतीच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. संजीव सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंची पदे रिक्त होती. त्यामुळे यासंदर्भात राज्यपालांकडून समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने विविध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर राजभवनाकडून आता कुलगुरूपदाच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण राबविले जाणार आहे. त्यामुळे या नव्या कुलगुरुंवर मोठी जबाबदारी आहे.
विद्यापीठ आणि कुलगुरू असे
डॉ. रवींद्र कुलकर्णी – मुंबई विद्यापीठ, मुंबई
डॉ. सुरेश वामनगीर गोसावी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
डॉ. संजय भावे – कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.
डॉ. रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत.
डॉ सुरेश वामनगीर गोसावी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत.
डॉ. संजय भावे हे डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे प्रमुख आहेत.
Governor Declared Name Vice Chancellor Universities