मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाषणात शिवरायांचा उल्लेख केला, त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला आहे, त्यामुळे राज्यभर राज्यपालांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, अशा स्थितीत राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यपाल पदापासून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची बातमी काही माध्यमांमध्ये प्रसारित होत होती, मात्र आता राजभवनाने याचे खंडन करण्यात आहे की, हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले.
विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रातील जनतेला दुखावणारी वक्तव्ये करत आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यपाल विरोधकांसह राज्यातील जनतेच्या निशाण्यावर आले आहेत. विविध स्तरातून राज्यपालांना तीव्र विरोध होत आहे, तसेच काहीजण त्यांना पदमुक्त करा, अशी मागणी करत आहेत. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत होती.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याचे वृत्त पूर्णत: निराधार आणि चुकीचे आहे. या बातमीचे खंडन राजभवनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी सातत्याने महाराष्ट्रातील नागरिकांना दुखावणारी वक्तव्ये करत असतात. मुंबईतून गुजरातींचा पैसा काढून घेतला तर काही उतरणार नाही, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत नुकतेच केलेले वक्तव्य यावरून महाराष्ट्रातील नागरिकांनी तसेच विविध संघटनांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारमधील भाजपने यावर तत्काळ भूमिका घेऊन, महाराष्ट्रातून या राज्यपालांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. महाविकास आघाडीचे यावर एकमत असून लवकरच या मागणीसाठी आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र बंद’ केला जाईल, असा इशाराही उद्धव ठाकरेंकडून देण्यात आला होता; परंतु या संपूर्ण प्रकरणाला आता कलाटणी मिळाल्याचे दिसत आहे. मात्र आता राज्यपालांनाच महाराष्ट्रात या पदावर राहण्याची इच्छा नसल्याचे समजत आहे.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील पत्रकार परिषदमध्ये सांगितले होते की, मी राज्यपालांना भेटायला गेलो होतो तेव्हा राज्यपालांनी महाराष्ट्रात इच्छा नसल्याचे म्हटले होते, त्यामुळेच ते अशी उलटसुलट वक्तव्य करीत असतात, असे पवार म्हणाले होते. परंतु प्रत्यक्षात सध्यातरी राज्यपाल राजीनामा देणार नाहीत असे राजभवनातून सांगण्यात आले आहे. विरोधकांनी मात्र त्या कथित विधानावरून भाजपाला कोंडीत पकडले आहे. त्यातच सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पदमुक्त होणार असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली. तसेच काही माध्यमांमध्ये बातम्या दिसू लागल्या होत्या. मात्र यावर आता राजभवनातून खुलासा करण्यात आला आहे.
उदयनराजेंना अश्रू अनावर
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याचं वृत्त पूर्णत: निराधार आणि चुकीचे आहे. या बातमीचं खंडन राजभवनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पदमुक्त होण्याच्या चर्चेला विराम मिळाला आहे. मात्र अद्याप भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा दि. २८ नोव्हेंबरपर्यंतची दिलेली मुदत संपल्याने आंदोलन पुकारले आहे. राज्यपालांच्या निषेधार्थ ३ डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर जनआक्रोश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. उदयनराजे भोसले म्हणाले, हा दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तरी परवडले असते, असे सांगत असताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले होते.
Governor Bhagat Singh Koshyari Rajbhavan Clarification