नवी दिल्ली – पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने हफ्ते उचलणार्या शेतकर्यांची आता गय केली जाणार नाही. उत्तर प्रदेशात अशा शेतकर्यांकडून वसुली करण्यात आली आहे. मैनपुरी जिल्ह्यात प्रशासनाने ९२१९ अपात्र शेतकर्यांची यादी कृषी विभागाला पाठविली आहे. कृषी विभागाने या शेतकर्यांना नोटिसा पाठवून योजनेचे पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यात पती-पत्नीपासून मृत शेतकरी, करदाते, निवृत्तीवेतनधारक, चुकीच्या खात्यात पैसे जमा, खोटे आधारकार्ड आदी फसवणुकीच्या प्रकरणांचा समावेश आहे.
पैसे असे जमा करणार
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे घेणार्या अपात्र शेतकर्यांना कृषी उपसंचालक कार्यालयात रक्कम जमा करावी लागणार आहे. पैसे जमा केल्यानंतर संबंंधितांना पावती दिली जाईल. कृषी विभागाकडून ही रक्कम केंद्र शासनाच्या खात्यात जमा करून ऑनलाइन पोर्टलवरून शेतकर्यांचा डाटा डिलीट करणार आहे.
३२ हजार मृत शेतकर्यांना पैसे
अपात्र लाभार्थ्यांच्या मोठ्या संख्येत सर्वाधिक ३,८६,००० चुकीचे खाते किंवा खोटे आधारकार्डधारक शेतकर्यांचे आहेत. दुसर्या क्रमांकावर करदाते असून, त्यांची संख्या २,३४,०१० आहे. तसेच ३२,३०० लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तरीही दरवर्षी २०००-२००० रुपयांचे तीन हफ्ते घेत आहेत. तर इतर अपात्रांची संख्यासुद्धा ५७,९०० इतकी आहे.
देशात ४२ लाखांहून अधिक अपात्र
देशात ४२ लाखांहून अधिक अपात्र लोकांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचे दोन-दोन हजार रुपयांच्या हफ्त्यांप्रमाणे २,९०० कोटी रुपयांचा चुना सरकारला लावला आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली होती. या योजनेंतर्गत सहा शेतकर्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये प्रतिमहिना याप्रमाणे तीन हफ्त्यात हजार रुपये जमा केले जातात.
अडीच कोटी शेतकर्यांचे हफ्ते प्रलंबित
ऑगस्ट-नोव्हेंबर महिन्याचे दोन हजार रुपयांचे हफ्ते जवळपास ९,८०,६६० शेतकर्यांच्या खात्यात जमा झाला आहे. किसान पोर्टवर दिलेल्या आकडेवारीनुसार, या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकर्यांची संख्या १२.१३ कोटींहून अधिक आहे. म्हणजेच अजूनही अडीच कोटी शेतकर्यांचे हफ्ते प्रलंबित आहेत.