इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण द्यावे असा सर्व साधारणपणे नियम आहे, त्याप्रमाणे काही शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले धडे देतात. परंतु अनेक राज्यांमध्ये असे दिसून येते की, शिक्षक विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवत नाहीत. या उलट टाईमपास करीत असतात. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांना शालेय भोजन किंवा पोषण आहार वेळेवर मिळत नाही, असाच प्रकार बिहारमध्ये घडला.
विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे तक्रार केल्यानंतर गावातील सर्व माता पालकांनी एकत्र होत मुख्याध्यापिका आणि शिक्षिकांकडे घेराव घालत याबद्दल विचारणा केली, परंतु त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या त्यामुळे या महिलांनी शिक्षिकांना मारहाण करीत त्यांचे केस उपटले. जिल्ह्यातील संहोला गटातील दिशारथ (खुर्दभुंडी) प्राथमिक शाळेतही घटना घडली.
या प्रकरणात, शाळेच्या मुख्याध्यापिका रेणू कुमारी यांना गावकऱ्यांनी ओलीस ठेवले होते. यावेळी ग्रामीण महिला आणि मुख्याध्यापक यांच्यात हाणामारी झाली. महिलांनीही शिक्षकावर हात साफ केला. रेणू कुमारी या गेल्या 15 वर्षांपासून या शाळेत काम करत असून तिच्या वृत्तीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे गावातील मुलांना शाळेत असतानाही दुसऱ्या गावात शिकण्यासाठी जावे लागते. कारण येथे नीट शिकवले जात नाही आणि माध्यान्ह भोजनही नीट दिले जात नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक आपल्या मनमानी वृत्तीला आवर घालत नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे मुख्याध्यापकाला शाळेतून काढून टाका, असे म्हणत ग्रामस्थांनी गोंधळ घातला. शाळेच्या स्वयंपाक्याने सांगितले की, शाळेत कधीही मेनूनुसार जेवण बनवले जात नाही, फक्त मुख्याध्यापक सांगतात तसे निकृष्ट जेवण बनवले जाते. पाऊस आला तर स्वयंपाक करता येत नाही, कारण किचनचे छत पूर्णपणे तुटले आहे, त्यामुळे पावसाचे पाणी अन्नात पडू लागते. यामुळेच येथे मुलांना योग्य आहार मिळत नाही.
शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्ही सर्वच या शाळेत नीट अभ्यास करू शकत नाही. शाळेतील प्रसाधनगृहात फक्त मुख्याध्यापक आणि शिक्षिका जातात आणि नंतर बाथरूमला कुलूप असते, त्यामुळे मुलांना लघवी व शौचालयासाठी घरी जावे लागते. आता या गावातील मुले हळूहळू दुसऱ्या गावात दाखल होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी, बीडीओ व गटशिक्षणाधिकारी यांना लेखी तक्रार दिली आहे.
दरम्यान, दुसरीकडे घेरावामधून संधी मिळताच मुख्याध्यापिका गावकऱ्यांमधून बाहेर पडली आणि तिने पोलिस ठाण्यात जाऊन ग्रामस्थांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. शाळेत 175 मुले शिकतात. ग्रामस्थांचे सर्व आरोप खोटे आहेत. गावातल्या बायका आल्या तेव्हा मी मुलांना शिकवत होते . या महिलांना भडकावण्यात आले आहे.
government school guardians beaten to teachers crime Bihar Bhagalpur