नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय पाटबंधारे आणि जलसंपदा मंडळाच्या अंतर्गत प्रशासन अधिकारी, सिंचपाल आणि सिंचपाल पर्यवेक्षक या पदांच्या भरतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अशा प्रकारची भरती केली जात नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच, एका बनावट वेबसाईटच्या माध्यमातून ही भरती केली जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
https://niwrb-gov.org ही एक बनावट वेबसाइट (संकेतस्थळ) आहे. या संकेतस्थळावरून राष्ट्रीय पाटबंधारे आणि जलसंपदा मंडळाच्या अंतर्गत प्रशासन अधिकारी, सिंचपाल आणि सिंचपाल पर्यवेक्षक या पदांसाठी भरती करत असल्याचा दावा करण्यात आला. ही बाब जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान (DoWR, RD &GR) विभागाच्या निदर्शनास आली आहे.
जल शक्ती मंत्रालयाचा जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान (DoWR, RD &GR) विभागाने स्पष्ट केले आहे की, उपरोक्त वेबसाइट बनावट आहे आणि राष्ट्रीय सिंचन आणि जल संसाधन मंडळ नावाची कोणतीही संस्था या विभागाशी संबंधित नाही. जल शक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान (DoWR, RD &GR) विभागाने 22.06.2023 रोजी सायबर गुन्हे ऑनलाइन पोर्टलवर उपरोक्त बनावट वेबसाइटबाबत पुढील योग्य कारवाईसाठी तक्रार दाखल केली आहे. तसेच,या विभागाने भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला (CERT-In) बनावट वेबसाइट ब्लॉक करण्याची आणि वेबसाइटच्या मालकांवर योग्य कारवाई करण्याची विनंती केली आहे.
https://twitter.com/PIBFactCheck/status/1671532017899503617?s=20