इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जून महिन्याचा पहिला दिवस राजस्थानमधील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता घेऊन येणारा ठरला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राजस्थान सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला असून त्याचा लाभ लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. राजस्थान सरकारच्या निर्णयानुसार, आता तेथील सरकारी कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्समध्ये पगार मिळणार आहे.
राजस्थान सरकारने इतर राज्यांना मागे टाकत सर्वांत प्रथम अॅडव्हान्समध्ये पगार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही नवी व्यवस्था १ जून २०२३ पासून लागू झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आगावू वेतन सुविधा लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य बनले आहे. आतापर्यंत अॅडव्हान्स पगार देशातील कुठल्याही राज्यात दिला जात नव्हता. राज्य सरकारचे कर्मचारी आणि अधिकारी आपल्या वेतनातील अर्धा हिस्सा अॅडव्हान्स म्हणून घेण्यासाठी हक्कदार असतील.
एकावेळी २० हजार रुपयांचं कमाल आगावू वेतन जमा केले जाईल. ही व्यवस्था -आजपासून लागू होणार आहे. त्यासाठी वित्त विभागाने एका नॉन बैंकिंग फायनान्स कंपनीसोबत करार केला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही इतर वित्तिय संस्थांशी करार करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामध्ये काही बँकांचाही समवेश आहे. राजस्थानमध्ये काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून विविध घोषणांचा पाऊस पाडला जात आहे.
द्यावे लागणार ट्रान्झॅक्शन चार्जेस
सरकारी कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्समध्ये आपला पगार घेतल्यावर कुठल्याही प्रकारचे व्याज भरावे लागणार नाही. त्यांच्याकडून केवळ ट्रान्झॅक्शन चार्जेस घेण्यात येतील. अर्धे वेतन आधीच मिळण्याच्या सुविधेमुळे छोट्या कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे. आता त्यांना गरजेच्या वेळी व्याज देऊन कर्जाऊ पैसे घ्यावे लागणार नाहीत.
Government Office Employee Advance Salary