पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनने (NBCC India ) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली राबविण्यास सुरुवात केली आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, nbccindia.com वर जा. त्यानंतर करिअर विभागात जाऊन संबंधित भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा. तसेच येथील लिंकद्वारे उमेदवार थेट अर्ज करु शकतात. अर्ज व शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. तसेच एससी, एसटी, दिव्यांग आणि विभागीय उमेदवारांना शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.
23 पदांसाठी भरती : महाव्यवस्थापक (अभियांत्रिकी), अतिरिक्त महाव्यवस्थापक (मार्केटिंग), प्रोजेक्ट व्यवस्थापक (सिव्हिल) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NBCC च्या अधिकृत वेबसाइट nbccindia.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 23 पदांची भरती करण्यात येणार आहे. पदांची एकूण संख्या- 23, महाव्यवस्थापक (अभियांत्रिकी)- 06 पदे, अतिरिक्त महाव्यवस्थापक (विपणन)- 02 पदे, प्रोजेक्टर महाव्यवस्थापक (सिव्हिल)- 15 पदे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 जून 2022
जनरल मॅनेजरच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली असावी. अतिरिक्त महाव्यवस्थापक पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील एमबीए पदवी असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
या भरतीअंतर्गत महाव्यवस्थापक (अभियांत्रिकी) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 49 वर्षे, अतिरिक्त महाव्यवस्थापक (विपणन) या पदासाठी उमेदवारांचे वय 45 वर्षे असावे. प्रकल्प व्यवस्थापक (सिव्हिल) पदासाठी उमेदवाराचे वय 37 वर्षे असावे.
पदाचे नाव – संख्या आणि पगार खालीलप्रमाणे
महाव्यवस्थापक (अभियांत्रिकी) – 06 पदे – पगार 90,000 ते 2,40,000 रूपये
अतिरिक्त महाव्यवस्थापक (मार्केटिंग) – 02 पदे – पगार 80,000 ते 2,20,000 रुपये
प्रोजेक्ट जनरल मॅनेजर (सिव्हिल) – – 15 पदे पगार 60,000 ते 1,80,000 रुपयांपर्यंत आहे.