मुंबई – सध्याच्या काळात अनेक तरुण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. त्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असून आता याकरिता प्रयत्न करणार्या उमेदवारांना विविध राज्यांमधील अनेक विभागात सरकारी नोकरीची चांगली संधी आहे.
नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांना प्रामाणिकपणे कामाची आवड आणि खूप मेहनत करण्याची इच्छा असल्यास सरकारी नोकरी मिळवणे खूप सोपे आहे. तसेच त्यांना केंद्र आणि राज्य सरकारांतर्गत विविध विभागांमध्ये सुरू झालेल्या भरतींमुळे ही संधी मिळणार आहे.
PSSSB भरती परीक्षा
अधीनस्थ सेवा निवड मंडळ पंजाबने PSSSB भरती 2021 साठी घेण्यात आलेल्या परीक्षांसाठी माहिती प्रसिद्ध केली आहे. तलाठी आणि सिंचन बुकिंग लिपिकाच्या दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी या ‘उत्तर की ‘ प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पीएसएसएसबी भरती 2021 च्या उत्तर की वरील अधिकृत सूचनेनुसार, उमेदवार 9 सप्टेंबर 2021 रोजी पर्यंत sssb.punjab.gov.in वर आक्षेप नोंदवू शकतात.
भारतीय रेल्वे व्हील फॅक्टरी
या विभागात अपरेंटिस भर्ती अंतर्गत सरकारी नोकरी ची संधी असून यात 11 हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळेल. प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षणाच्या कालावधीत फिटर, मशिनिस्ट, मेकॅनिक (मोटार वाहन), टर्नर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या ट्रेड ट्रेनिंग मध्ये विविध नियुक्त ट्रेड मध्ये रेल्वे व्हील फॅक्टरी च्या अपरेंटिस भर्ती अंतर्गत तर सीएनसी प्रोग्रामिंग-कम-ऑपरेटरसाठी दरमहा 10,899 रुपये वेतन दिले जाईल. अधिक तपशीलांसाठी उमेदवारांनी या थेट रेल्वे विभागांच्या नोकर भरती लिंकवर भेट द्यावी. किंवा रेल्वे व्हील फॅक्टरी भरती 2021 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरावा आणि तो “वरिष्ठ कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, बंगलुरू येथे संबंधित कागदपत्रांसह दि. 13 सप्टेंबर 2021 पूर्वी पाठवणे आवश्यक आहे.
भारतीय वायुसेना
इयता 10 वी ते पदवी पर्यंतचे उमेदवार भारतीय वायुसेनेच्या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, किमान पात्रता, कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांच्या संदर्भात सर्व अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर, पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर देण्यात येतील. अधिक तपशीलांसाठी उमेदवार या थेट दुव्यावर क्लिक करू शकतात. यासाठी निवड प्रक्रिया असून वयोमर्यादा, किमान पात्रता, कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांच्या संदर्भात सर्व अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर, पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर देण्यात येतील. पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेला हजर राहावे लागेल. लेखी परीक्षा किमान शैक्षणिक पात्रतेवर आधारित असेल. यात सुतार, कुक, मल्टी टास्किंग स्टाफ, हाऊस कीपिंग स्टाफ, लोअर डिवीजन लिपिक, स्टोअर कीपर, पेंटर, अधीक्षक आणि इतर पदांच्या अनेक भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार ‘रोजगार संवाद’ मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत दि. २ ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यातून पदांसाठी अर्ज करू शकतात.