पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) पदासाठी दि. १५ जूनपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2022 आहे. एकूण 400 कनिष्ठ कार्यकारी पदे भरणे हे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
वयोमर्यादा:
14 जुलै 2022 रोजी कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे. उच्च वयोमर्यादा PWD साठी 10 वर्षे, SC/ST साठी 5 वर्षे आणि OBC (नॉन-क्रिमी लेयर) उमेदवारांसाठी 3 वर्षे शिथिल आहे.
शैक्षणिक पात्रता :
भौतिकशास्त्र आणि गणितासह विज्ञान (बीएससी) मध्ये तीन वर्षे पूर्ण वेळ नियमित बॅचलर पदवी. किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ नियमित बॅचलर पदवी. (भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय कोणत्याही एका सेमिस्टरच्या अभ्यासक्रमात असावेत).
फी :
उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC/ST/महिला उमेदवारांना फक्त रु.81 भरावे लागतील. तथापि, PWD आणि AAI मध्ये एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणार्या शिकाऊ उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
येथे अर्ज करा
इच्छुकांनी www.aai.aero या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. मेन पेजवर, “करिअर” टॅबवर क्लिक करा. AAI मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल) पदासाठी थेट भरतीसाठी जाहिराती आहे. तेथे खाली उपलब्ध असलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा.. नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
निवड प्रक्रिया :
उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन चाचणीतील कामगिरीच्या आधारावर निवडले जाईल आणि त्यांना दस्तऐवज पडताळणी/व्हॉइस टेस्टसाठी बोलावले जाईल. DV/व्हॉइस टेस्टसाठी निवडलेल्या उमेदवारांचे रोल नंबर फक्त AAI च्या वेबसाइटवर घोषित केले जातील.
एवढा मिळेल पगार :
कनिष्ठ कार्यकारी पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 40,000 ते 1,40,000 रुपये वेतन दिले जाईल. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट द्या.