विशेष प्रतिनिधी, मुंबई
सध्याच्या काळात अनेक तरुण बेरोजगार असून सरकारी नोकरी मिळवणे त्यांना कठीण वाटते. परंतु आता सरकारी विभागांमध्ये अनेक नोकऱ्या उपलब्ध होत असून त्वरित करा अर्ज करून अभ्यास व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास सरकारी नोकरी मिळू शकेल. विविध सरकारी विभागांमध्ये सुमारे २४ हजार नोकऱ्या आहेत. नोकरीची तयारी करण्यापेक्षा योग्य संधी शोधणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत सरकारी नोकरीची सुवर्ण संधी कोठे आणि केव्हा आहे. या विषयी जाणू घेऊन या …
उत्तर रेल्वे विभाग
उत्तर रेल्वेच्या ९५३४ विविध पदांवर भरतीसाठी ही निवड प्रक्रिया केली जाणार आहे. वॉक-इन-इंटरव्ह्यू आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे अर्जदारांची निवड केली जाईल. प्रथम कागदपत्रांच्या पडताळणीच्या आधारे अर्जदारांना सभागृह, पहिला मजला, शैक्षणिक ब्लॉक, उत्तर रेल्वे मध्यवर्ती रुग्णालय, नवी दिल्ली येथे वॉक-इन-मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. मुलाखतीत अर्जदारांच्या कामगिरीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. वैद्यकीय चिकित्सकांच्या जागांसाठी भरती केली जाईल. इच्छुक उमेदवार मुलाखतीस २८ एप्रिल ते ७ मे या कालावधीत उपस्थित राहू शकतात.
भारतीय नौदल
भारतीय नौदलाने २५०० नाविक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. २६ एप्रिलपासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार नेव्ही https://www.joinindiannavy.gov.in/ च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. निवडलेल्या अर्जदारांना जास्तीत जास्त ६९,१०० रुपये पगार दिला जाऊ शकतो.
अंगणवाडी सेविका
महिला व बालविकास विभागात एकात्मिक बालविकास सेवा (आयसीडीएस) अंतर्गत उत्तर प्रदेशच्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व सहायिका यांची ५३०० पदे भरती केली जात आहेत. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र पोस्ट सर्कल
महाराष्ट्र डाक मंडळानेही ग्रामीण डाक सेवकांच्या २४२८ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविणारी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार महाराष्ट्र पोस्टल सर्कलसाठी भारतीय पोस्टल वेबसाइट https://indiapost.gov.in किंवा https://appost.in/gdsonline येथे २६ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.