बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी नाशकात सुरू होणार स्वतंत्र कक्ष

नोव्हेंबर 3, 2022 | 7:36 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221103 WA0008

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काम करावे. तसेच आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती देणारे शहरी व ग्रामीण भागासाठी दोन स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावे, असे निर्देश बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री श्री भुसे बोलत होते.

या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक महानरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, मालेगाव महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विष्णुपंत गर्जे, जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता पी. सी. भांडेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंद पिंगळे, सहकार विभागाचे उपनिबंधक सतीश खरे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम गोसावी यांच्यासह सर्व यंत्रणाचे अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्वांना मिळवा यासाठी जिल्हा पातळीवर शहरी व ग्रामीण भागासाठी प्रत्येकी एक कक्ष स्थापन करण्यात यावा. या कक्षात आरोग्य मित्रांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत या योजनांची माहिती देवून लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच या कक्षाला टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्याचे देखील नियोजन करण्यात यावे. लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वाटप करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, अंगणवाडी व आशा सेविका तर शहरी भागात महानगरपालिकेचे वार्ड अधिकारी यांची मदत घ्यावी. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्राधान्याने या योजनांचा लाभ सर्व नागरिकांना मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे गेल्या माहिन्यात आपल्या जिल्ह्याचा आयुष्यमान कार्ड वाटपात राज्यात प्रथम क्रमांक आला असल्याची बाब कौतुकास्पद असून हे स्थान कायमस्वरूपी टिकवून ठेवावे. ज्या नगरपरिषदा व तालुक्यांची कामे 50 टक्क्यांपेक्षा कमी आहेत त्यांनी येणाऱ्या काळात 100 टक्के कामे पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी भागात ज्या ठिकाणी शासकीय जागा घरांसाठी राखीव म्हणून असतील त्या जागा या योजनेच्या लाभार्थ्यांना नियमानुसार देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच ग्रामीण भागातील जे लाभार्थी गावात राहत नाहीत त्यांच्याबाबत तसा ग्रामसभेकडून ठराव घ्यावा आणि ज्या लाभार्थ्यांकडे जागा नाहीत त्यांना जागा वाटपाच्या कामासाठी प्राधान्य देवून या कामाला गती देण्यात यावी. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा 1 मध्ये पूर्ण झालेल्या पाच वर्षांआतील कामांची देखभाल दुरूस्ती करण्यात यावी. तसेच ज्या कामांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल त्यांच्याही दुरूस्तीसाठीचा प्रस्ताव सादर करावा, असेही दादाजी भुसे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांचे ई केवायसी प्रलंबित राहणार नाही, यासाठी नियोजन करण्यात यावे. जेणेकरून भविष्यात येणाऱ्या योजनांचा देखील लाभ शेतकऱ्यांना मिळेल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मृदा आरोग्य कार्डच्या आधारे त्यांच्या जमीनीच्या आरोग्याविषयी सविस्तर व योग्य माहिती त्यांना देण्यात यावी. त्‍यासाठी कृषी महाविद्यालयात शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश करून घ्यावा. ज्यामुळे त्या विद्यार्थ्यांना देखील प्रत्यक्ष कामातून अनुभव मिळेल. किसान क्रेडीट कार्ड योजनेंतर्गत या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जासाठी वारंवार कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता असणार नाही, असे अपेक्षित असून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. तसेच नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी 50 हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होतील यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिल्या. या बैठकीत सर्व यंत्रणांनी आप आपल्या कामांची माहिती सादर केली.

Government Health Scheme Review Meeting
Nashik Special Cell

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अंमली पदार्थ विकणारे दोघे जेरबंद; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त, नाशिक पोलिसांची कारवाई

Next Post

तब्बल तीन वर्षांनी प्रियंका चोप्रा मुंबईत; तिचा बॉडीगार्ड दिसतो सुपरस्टार सारखाच (Video)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
Fgpgq3jXoAU1dgc

तब्बल तीन वर्षांनी प्रियंका चोप्रा मुंबईत; तिचा बॉडीगार्ड दिसतो सुपरस्टार सारखाच (Video)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011