नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह, नाशिक येथे प्रवेशासाठी 30 जून ,2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उपव्यवस्थापकीय संचालक सारथी तथा उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी, पुणे तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती,नागपूर व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह, सरस्वती नगर, धात्रक फाटा, पंचवटी, नाशिक येथे मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा गटातील 75 मुलींसाठी व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपुर यांचेमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गच्या गटातील 75 मुलींसाठी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 50 मुलींसाठी अशा एकूण 200 मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात येत आहे.
येथील प्रवेशासाठी अटी व शर्ती https://sarthi-maharashtragov.in व https://mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असुन सारथी व महाज्योतीचे संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे स्वसाक्षांकित करून पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष संस्थेच्या नाशिक येथील खालील पत्त्यावर 30 जून, 2023 पर्यंत सादर करावेत.
सारथी विभागीय कार्यालयाचा पत्ता- बँरेक नंबर, विभागीय आयुक्त कार्यालय आवार, नाशिकरोड, नाशिक 422101, दूरध्वनी क्रमांक 0253-2993689 ईमेल- sarthinashik@gmail.com असा आहे.
महाज्योती विभागीय कार्यालयाचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण कार्यालय, नाशिक-पुणे रोड, नाशिक -422011, संपर्क क्रमांक 8087576393 ईमेल- mahajyotinsk@gmail.com असा आहे.
वसतिगृहाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींनी शासनाच्या इतर वसतिगृहाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, वसतिगृहात प्रवेश देण्यात येणाऱ्या पात्र मुलींची यादी संबंधित सारथी/ महाज्योती/ उच्च व तंत्र शिक्षणविभाग यांनी कागदपत्रांची पडताळणी करुन अंतिम केल्यानंतर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रवेशासाठी पात्र विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रत्यक्ष दाखल (हजर) होण्याचा दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. असे उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी तथा उपजिल्हाधिकारी, नाशिक सीमा अहिरे यांनी कळविले आहे.
Government Girls Hostel Admission