कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडनाव आणि गावाची नावे जुन्या काळात इतकी विचित्र ठेवलेली आहेत की आज आधुनिक युगात त्यांचा उल्लेख करताना लोकांना कमालीचा त्रास होतो. कोल्हापुरातील एका तालुक्यात असलेल्या छोट्याशा गावाची अशीच कहाणी आहे. या गावाचे नाव बदलण्याची विनंती करूनही एनआयसीने बदलले नाही. नाव ऐकुनही तुम्ही थक्क व्हाल.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदवड तालुक्यात डुक्करवाडी नावाचं गाव आहे. पूर्वीच्या काळी कुठल्या कारणाने हे नाव ठेवले असावे, हे एक रहस्यच आहे. पण आज या नावाचा उल्लेख करताना नक्कीच विचित्र वाटणे स्वाभाविक आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून डुक्करवाडी नाव बदलण्याची विनंती गावकऱ्यांनी केली. त्यानुसार चंदगड तालुका प्रशासनाने एनआयसीकडे (नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर) डुक्करवाडी नाव बदलून रामपूर करण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यानंतर नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असावी, असे सर्वांनाच वाटले.
तालुका प्रशासन सरकारी कामे करताना जेव्हा ऑनलाईन पोर्टलवर तालुका सिलेक्ट करायला जातात. तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यात चंदगडच्या ऐवजी रामपूर तालुका येत आहे. वारंवार प्रयत्न करूनही तसेच होत असल्यामुळे एनआयसीने गावाचे नाव बदलण्याऐवजी तालुक्याचेच नाव बदलल्याचे सर्वांच्या लक्षात आले. खरं तर प्रस्ताव चंदगड तालुक्यातील एका गावाचं नाव बदलण्याचा होता. पण त्या गावाचं नाव बदलण्याऐवजी थेट चंदगड तालुक्याचं नाव बदलण्यात आले. त्यामुळे भलताच घोळ होऊन बसला होता. एनआयसीच्या या एका चुकीमुळे चंदगड तालुक्यातील लोकांना मात्र चांगलाच फटका बसला आहे.
तांत्रिक अडचणींचा डोंगर
या प्रकारामुळे चंदगड तालुक्यातील नागरिक संभ्रमात पडले आहेत. चंदगड तालुक्याचे नाव बदलले जाण्याचे हे प्रकरण खूप गंभीर आहे. कारण ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे काढत असलेल्या नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. कोल्हापुरात रामपूर तालुका अस्तित्वातच नसल्याने नागरिकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ नावाच्या बदलामुळे सर्व कामकाज ठप्प झाले आहे.
Government Department Work Name Change