मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुगल क्रोम ब्राउजरचा वापर करणार्या युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने गुगल क्रोमचा वापर करणार्या युजर्ससाठी इशारा जारी केला आहे. गुगल क्रोम त्वरित अपडेट करून घ्यावे असा इशारा इंडियन कॉम्प्युटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) दिला आहे. ९७.०.४६९२.७१ हे गुगल क्रोमचे व्हर्जन वापरणार्यांसाठीच हा इशारा आहे. असे युजर हॅकर्सच्या जाळ्यात येऊ शकतात, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
CERT-In ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, गुगल क्रोममध्ये अनेक कमतरता आढळल्या आहेत. गुगल क्रोम टाइपच्या गोंधळामुळे V8 चा वापर करण्यासाठी सुरक्षित नाही. यामध्ये वेब अॅप, युजर इंटरफेस, स्किन कॅप्चर, फाइल एपीआय, ऑटो फिल आणि डेव्हलपर्स टूल्ससारख्या अनेक कमतरता आढळल्या आहेत. युजर क्रोम कोणी अपडेट केले नसेल तर डिव्हाइसचा रिमोट हॅक होण्याचा धोका संभावतो, असे सरकारने म्हटले आहे.
या कमतरतांचा गैरफायदा कोणताही सायबर गुन्हेगार घेऊ शकतो. हे गुन्हेगार क्रोम युजर्सना कोणत्याही हानिकारक पेजवर घेऊन जाऊ शकतात. गुन्हेगारांनी याचा गैरफायदा घेतला तर ते तुमच्या डिव्हाइसवर मॅलिशियस कोड रन करून तुमची खासगी माहिती चोरू शकतील. त्यामुळे सरकारसह गुगलच्या टीमनेही युजर्सना क्रोम ब्राउजर अपडेट करण्याच्या सूचना केल्या आहेत.
असे करा अपडेट
आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व युजर्सनी जुने ब्राउजर अपडेट करून घ्यावे.
– अपडेट करण्यासाठी क्रोम ब्राउजर ओपन करून Menu मध्ये जा
– त्यानंतर Help पर्यायावर क्लिक करा.
– तेथे तुम्हाला About Google Chrome नावाचे पर्याय दिसेल.
– येथे गेल्यावर तुमचा ब्राउजर अपडेट होणे सुरू होईल.
– त्यानंतर तुम्हाला रिलाँचवर क्लिक करावे लागेल.