मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अखेर राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे फर्मान काढले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री राज्यपालांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचे फडणवीस यांनी राज्यपालांना सांगितले. राज्य सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगावे, अशी विनंती फडणवीस यांच्यासह भाजप शिष्टमंडळाने राज्यपालांकडे पत्राद्वारे केली. त्याची दखल तत्काळ राज्यपालांनी घेतली. त्यानुसार, आज सकाळीच राज्यपालांनी एक फर्मान काढले आहे. विधीमंडळाच्या सचिवांना हे पक्ष देण्यात आले आहे. त्यात नमूद केले आहे की, गुरुवार, ३० जून रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने त्यांचे बहुमत सिद्ध करावे. सकाळी ११ वाजता हे अधिवेशन सुरू होईल आणि सायंकाळी ५ वाजता बहुमत चाचणी घेण्यात यावी, असे राज्यपालांनी निर्देशित केले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.
#Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari directs for conducting Floor test tomorrow, 30th June pic.twitter.com/ZIgNt3dnHj
— DD News (@DDNewslive) June 29, 2022
सेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार उद्याच मुंबईत येणार आहेत. तशी माहिती शिंदे यांनीच दिली आहे. सर्व आमदारांना तयार राहण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पहाटेच्या सुमारास विशेष विमानाने हे सर्व आमदार मुंबईत दाखल होणार असल्याचे सांगितले जाते.
Governer call Special Assembly session floor test Maharashtra Political Crisis