नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रामनवमी निमित्त्ताने राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमवेत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील प्रसिद्ध काळाराम मंदिर येथे विधिवत पूजन करत प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घेतले. यावेळी काळाराम मंदिर ट्रस्टच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मंत्री छगन भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला.