इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पहलगाम हल्लेखोरांची ओळख आणि पार्श्वभूमी याबद्दलचा अहवाल प्रसारमाध्यमे / समाजमाध्यमे यांच्याद्वारे प्रसारित केला जात आहे आणि त्यासाठी सैन्यदलांचा हवाला देण्यात येत आहे. भारतीय सशस्त्र दलाच्या कोणत्याही अधिकृत प्रसारमाध्यम हँडलने असा कोणताही दस्तऐवज तयार केलेला नाही किंवा जारी केलेला नाही. सशस्त्र दलाच्या जनसंपर्क कार्यालयांनी/नियुक्त प्रवक्त्यांनी अशा प्रकारची कोणतीही टिप्पणी केलेली नाही.
हा अहवाल म्हणजे चकमकीनंतरच्या निष्कर्षांबाबत खुल्या स्त्रोतांमधून गोळा केलेल्या माहितीचे संकलन असल्याचे दिसून येते.