नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने राज्य सरकारांना १० ऑक्टोबर रोजी ८९,०८६.५० कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाऐवजी १,७८,१७३ कोटी रुपयांचे कर हस्तांतरण केले आहे. यात ऑक्टोबर, २०२४ मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एका अग्रीम हप्त्याचा समावेश आहे.
आगामी सणासुदीचा काळ आणि राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देता यावी तसेच विकास/ कल्याणकारी उपक्रमांसंबंधी खर्चासाठी अग्रीम हप्ता जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्राला कर हस्तांतरणपोटी ११,२५५ कोटी रुपयांचे जारी करण्यात आले आहेत. जारी केलेल्या रकमेचे राज्यवार विभाजन खाली दिले आहे:
ऑक्टोबर 2024 साठी केंद्रीय कर आणि शुल्काच्या निव्वळ उत्पन्नाचे राज्यवार वितरण
अनुक्रमांक – राज्याचे नाव – एकूण (₹ कोटी)
1- आंध्र प्रदेश – 7,211
2- अरुणाचल प्रदेश -3,131
3- आसाम – 5,573
4 – बिहार – 17,921
5 – छत्तीसगड- 6,070
6 – गोवा – 688
7 -गुजरात – 6,197
8 – हरयाणा – 1,947
9- हिमाचल प्रदेश -1,479
10- झारखंड- 5,892
11- कर्नाटक- 6,498
12- केरळ- 3,430
13- मध्य प्रदेश- 13,987
14- महाराष्ट्र – 11,255
15 – मणिपूर – 1,276
16- मेघालय – 1,367
17 – मिझोराम – 891
18 – नागालॅंड – 1,014
19 – ओदिशा – 8,068
20 – पंजाब – 3,220
21 – राजस्थान- 10,737
22 – सिक्कीम – 691
23 – तामिळनाडू – 7,268
24 – तेलंगणा – 3,745
25 – त्रिपुरा – 1,261
26 – उत्तर प्रदेश – 31,962
27 – उत्तराखंड- 1,992
28 – पश्चिम बंगाल – 13,404