नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिक व सहआयुक्त, अनुसूचित जमाती तपासणी समिती नाशिक-2 ही दोन्ही कार्यालये आदिवासी विकास भवन, दुसरा मजला, गडकरी चौक, नाशिक येथून डॉक्टर हाऊस, दुसरा मजला, ठक्कर बाजार समोर, त्र्यंबक नाका, नाशिक या नवीन इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे, अशी माहिती अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नाशिक 2 चे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष किरण माळी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या दोन्ही कार्यालयांचे कामकाज नवीन इमारतीत 6 जानेवारी 2025 पासून नियमित सुरू होणार असून अनुसूचित जमातीच्या नागरिकांनी आपल्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणीच्या अनुषंगाने सर्व कामांसाठी नवीन स्थलांतरीत कार्यालयाच्या पत्यावर संपर्क साधावा तसेच पत्रव्यवहार करावा, असेही आवाहन श्री. माळी यांनी केले आहे