कोव्हेंक्सीन लसीबाबत नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी यांनी दिले महानगरपालिकेचे आयुक्तांना निवेदन
नाशिक – ४५ वर्षावरील ज्या नागरीकांनी कोव्हॅक्सीन या लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना २८ दिवसांच्यापुढे दुसरा डोस घेणे क्रम प्राप्त आहे. परंतु त्यांना कोव्हेंक्सीन या लसी न आल्यामुळे दुसरा डोस घेता येत नाही. त्यामुळे ज्या नागरीकांनी कोकॅक्सीन या लसीचा पहिला डोस घेतला आहे ते चिंतीत झालेले आहेत. त्यांना कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस उपलब्ध करुन द्यावा असे निवेदन नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी महानगरपालिकेचे आयुक्त यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसापुर्वी महानगरपालिकेने कोव्हॅक्सीन ही लस आली होती तेव्हा महानगरपालिकेच्या वैद्यकिय यांना नागरीकांना दुसरा डोस घेणेसाठी ही लस उपलब्ध करुन द्यावी अशी विनंती केली होती. त्यांनी ४५ वर्षापुढील नागरीकांनी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांना केंद्र शासनाकडून दुसरा डोस आल्यानंतर ही लस देण्यात येईल हे सांगितले. सदरचे आलेले डोस हे राज्य शासनाने १८ ते ४५ या वयातील नागरीकांना देण्यासाठी दिलेले आहेत असे सांगितले. महाराष्ट्र राज्य आरोग्य संचनालयात या बाबतीत कळविले असता त्यांनीही सदरची लस ही १८ ते ४५ वयोगटातच देण्यात यावी असे आदेशित केले आहे. हे आरोग्य वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले . यावरुन असे अभिप्रेत होते की , ४५ वर्षाखालील नागरीकांना राज्य शासन लस देते व ४५ वर्षापुढील नागरीकांना केंद्र शासन लस देते . परंतु सामान्य नागरीकांना याच्याशी काहीही देणे घेणे नाही . ज्या नागरीकांचा कोव्हॅक्सीन या लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवसांच्यावर झालेले आहे . ते नागरीक रोज सकाळी लसीकरण केंद्रावर जातात व लस न मिळाल्यामुळे ते परत येतात त्यातील बहुसंख्य हे ज्येष्ठ नागरीक आहे . जर मुदतीत त्यांना दुसरा डोस मिळाला नाही तर त्यांचा पहिला डोस घेऊन उपयोग होईल का ? ही चिंताही त्यांच्या मनात आहे . वरील सर्व परिस्थिती पहाता दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरीकांना कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस उपलब्ध करुन द्यावा असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.