गोरखपूर : बांसगाव परिसरातील कौडीराम शहरात कानाच्या उपचारासाठी आलेल्या एका महिलेने डॉक्टरवर अश्लील कृत्य केल्याचा आरोप करत आरडाओरडा केला, त्यामुळे तिचा आवाज ऐकून जमलेल्या लोकांनी डॉक्टरला मारहाण केली आणि डॉक्टरला पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, गगाहा भागातील एक महिला तिच्या मोठ्या बहिणीसह क्लिनिकमध्ये कानाच्या उपचारासाठी गेली होती, तेव्हा डॉक्टरांनी तिला एकट्या चेंबरमध्ये बोलावले आणि आजारपणाच्या बहाण्याने तिच्याशी अश्लील भाषा केली. तसेच डॉक्टरांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे डॉक्टरांच्या कृत्याने ती महिला रडतच चेंबरमधून पळत बाहेर पोहोचली आणि आरडाओरडा करू लागली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमले आणि या प्रकरणाची माहिती मिळताच लोकांनी या डॉक्टरला चेंबरच्या बाहेर आणले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. या डॉक्टराने कसाबसा पळून जाऊन आपला जीव वाचवला. दरम्यान, या डॉक्टरला कौडीराम चौकी पोलिसांच्या स्वाधीन केले गेले, सदर आरोपी डॉ.गणेश गौंड याच्यावर गेल्या वर्षी देखील अश्लील कृत्य केल्याचा आरोपही होता. त्यावेळी या प्रकरणी तो तुरुंगात गेला होता. आता देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी डॉक्टरला तुरुंगात पाठवले. सदर आरोपी हा नाक, कान आणि घशाच्या शस्त्रक्रियेचा मास्टर डिग्री धारक असल्याचा दावा करतो. तसेच त्याने गोरखपूर ते कुशीनगर पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी दवाखाने उघडले आहेत. दुसरीकडे, आरोपी डॉ. गौंड याचे म्हणणे आहे की, त्या महिलेने विनयभंगाचे केलेले आरोप निराधार आहेत.