मुंबई – पूर्वीच्या काळी एखादी गोष्ट समजली नाही की, लहान मुले ही आपले पालक यांना विचारत तसेच शाळेत गुरुजनांना विचारण्याची प्रथा होती. त्याचप्रमाणे सर्वसामान्य व्यक्ती देखील एखादी गोष्ट माहीत नसल्यास जाणकारांचा सल्ला घेत असत. परंतु आजच्या काळात अबाल वृद्धांसाठी एकच मार्गदर्शक आणि गुरु बनला आहे ! तो म्हणजे गुगल बाबा होय.
कुणाला काही मदत लागली की, लगेच गुगलची मदत घेण्यात येते. मग ते एखादा शब्द असो की, एखाद्या खाण्याचा पदार्थ बनवण्याची रेसिपी असो, गेल्या दोन वर्षात कोरानाचा संसर्ग असल्याने लॉक डाऊन काळात अनेक नागरिक घरीच होते, त्यामुळे मोबाईलचा वापर खूपच वाढला. त्यातच गुगल वर सर्च करणाऱ्यांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढली. त्यांनी यावेळी गुगलवर नेमके काय शोधले याचा आढावा घेतला असता, असे दिसून आले की, खाण्याचे पदार्थ बनवण्याची रेसिपी अधिक शोधली गेली त्यातही एक रेसिपी अत्यंत जास्त वेळा शोधण्यात आली कोणती होती ती?
अनेक मनोरंजक गोष्टी
यावर्षी लॉकडाऊन दरम्यान अनेक घरात बसून भारतीयांनी अनेक मनोरंजक गोष्टी शोधल्या आहेत. चक्रीवादळ, गारा तसेच कोरोना विषाणू बद्दल शोध घेतल्या गेला. तसेच गुगलवर शोधून अनेक प्रकारचे पदार्थ बनवण्याची कला काहींनी शिकली आहे. सन २०२१ चे गुगल शोध परिणाम खूप मजेदार आहेत. अनेकांनी विशिष्ट प्रकारची रेसिपी शोधली आहे. यामध्ये मटर पनीरपासून ते कॉकटेल पॉर्न स्टार मार्टिनी रेसिपीजचा शोध घेण्यात आला आहे. यंदा भारतीयांनी खाद्यपदार्थां बाबत गुगलवर कोणते प्रश्न विचारले होते ते जाणून घेऊ या..
रेसिपींचे १० शोध
यंदा भारतीयांनी गुगलवर सर्वात जास्त अनोखे मशरूम शोधले. तसेच सर्वाधिक शोधले गेलेले खाद्यपदार्थ होते. यानंतर गुगलवर मोदकाला सर्वाधिक सर्च करण्यात आले. या यादीत तिसरे स्थान मेथी मटर मलाईला मिळाले आहे, तर चौथे स्थान पालकाला मिळाले आहे, जिची रेसिपी गुगलवर सर्वाधिक शोधली गेली आहे. गुगलवर विचारलेल्या प्रश्नांमध्ये चिकन सूपची रेसिपी पाचव्या क्रमांकावर आहे.
पोर्न स्टार मार्टिनी
गुगलवर सर्वाधिक प्रश्न पॉर्न स्टार मार्टिनीच्या रेसिपीबाबत विचारण्यात आले आहेत. ही गुगलवर सर्वाधिक शोधली जाणारी सहावी रेसिपी आहे. एक क्लासिक फळाचे कॉकटेल आहे. हे कॉकटेल त्याच्या नावामुळे खूप चर्चेत आहे. या नावावर अनेकांनी आक्षेपही नोंदवला होता.
लसागा म्हणजे काय?
लसागा ही गुगलवर सर्वाधिक शोधली जाणारी सातवी रेसिपी आहे. ही एक इटालियन डिश आहे. यासह मटर पनीर सर्च लिस्टमध्ये टॉप-९ बनले आहे. तर या यादीत आठव्या क्रमांकावर असलेल्या कुकीज आणि दहाव्या क्रमांकावर असलेल्या काढा तयार करण्याची रेसिपी सर्वाधिक शोधण्यात आली आहे.