पुणे – गुगल हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. कारण आजच्या काळात अबाल वृद्धांसाठी एकच मार्गदर्शक आणि गुरु वाटतो तो म्हणजे गुगल बाबा होय. कुणाला काही मदत लागली की, लगेच गुगलची मदत घेण्यात येते. मग ते एखादा शब्द असो की, एखाद्या खाण्याचा पदार्थ बनवण्याची रेसिपी असो, गेल्या दोन वर्षात त्यातच गुगल वर सर्च करणाऱ्यांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढली. सर्वजण कोणत्याही गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करतो. परंतु अनेक वेळा आपल्याला योग्य शोध परिणाम मिळत नाहीत, त्यामुळे आपला खूप वेळ शोधण्यात वाया जातो. म्हणूनच काही टिप्स समजून घेतल्यास त्या सर्च करताना खूप उपयोगी पडतील.
दुहेरी उलटा स्वल्पविराम
गुगलवर एखादे विधान शोधत असाल आणि तुम्हाला ते सर्च इंजिनवर मिळत नसेल, तर तुम्ही दुहेरी उलटा स्वल्पविराम टाकून विधानाची ओळ लिहा. असे केल्याने तुम्हाला गुगलवर स्टेटमेंट मिळेल. तसेच तुमचा वेळही वाचेल.
वजा (-)
गुगलवरील बिनमहत्त्वाचे पेज काढायचे असेल तर वजा (-) वापरा. हे चिन्ह गुगल पेजवरील सर्व बिनमहत्त्वाची पेज काढून टाकेल. तुम्हाला गुगलवर योग्य परिणाम मिळतील.
स्टार (*)
गुगलवर एखादी ओळ शोधत आहात, तेव्हा दोन-चार शब्द विसरलात. तर या प्रकरणात त्या ओळीच्या समोर स्टार किंवा तारांकन (*) चिन्ह लावून शोध घ्या. यानंतर गुगलवर योग्य शब्दांसह संपूर्ण ओळ मिळेल. सोप्या शब्दात त्याला स्टार (Star ) म्हणतात.
फिल्टर व टॅब शोधा
आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी गुगलवर शोधत असतो, तेव्हा शोध फिल्टर आणि टॅब सर्वात उपयुक्त असतात. उदाहरणार्थ, तुम्ही जवळील कॅफे, मॉल किंवा पार्क शोधत असाल, तर चांगले शोध परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही शोध फिल्टर आणि टॅब वापरू शकता.