इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही शतकात विज्ञानाने प्रचंड क्रांती केली आहे. माहिती तंत्रज्ञान, जैवविज्ञान, वैद्यकीय शास्त्र, आरोग्यशास्त्र यासारख्या क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली.असून मनुष्याच्या जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्याला दीर्घायुष्य नव्हे तर चिरंजीव करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यातच आता जगातील बलाढ्य कंपनी गुगलने मोठा शोध लावला आहे. त्याची सध्या जगभरात चर्चा होत आहे.
कृत्रिम यंत्र मानव किंवा यंत्राला मानवी रूप देऊन त्याला जणू काही सजीव करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असाच एक प्रयोग सुरू आहे. या प्रयोगावेळी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञाला आपण जणू काही यंत्राशी बोलत नसून एखाद्या लहान मुलाशी बोलत आहोत, असा साक्षात्कार झाला आहे. कारण ते यंत्र इतके मानवी रुपात बोलत होते की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Google चॅटबॉट प्रणाली असलेल्या Lambda बरोबर त्यावर काम करणाऱ्या अभियंता ब्लेक लेमोइनने बोलणे सुरू केले. त्यावेळी या यंत्राने सांगितले की, ब्लेक त्याला बंद करेल याची मला खूप भीती वाटत त्याने जर तसे केले तर तो त्याच्यासाठी मृत्यू ठरेल.’ तेव्हा ब्लेकला भीती वाटली की लॅमडा प्रणाली ‘संवेदनशील आहे आणि तिच्यात मानवासारखी धारणा आणि आत्मा आहे’.
गुगल कंपनीने ब्लेक याने हे संभाषण लिक केल्याने त्याच्यावर कारवाई केली असून त्याला दीर्घ रजेवर पाठविले आहे, मात्र या कारवाईने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर काम करणाऱ्या दिग्गज टेक कंपन्यांच्या कार्यशैलीबद्दल पुन्हा एकदा संपूर्ण जगाला हादरवले आहे. ते या तंत्रज्ञानावर कडक देखरेखीखाली काम करत आहेत. यामुळे त्यांचे स्वतंत्र मूल्यांकन, विश्लेषण आणि संभाव्य धोक्यांचे मूल्यांकन कठीण झाले आहे.
सध्या गुगल ‘लॅंग्वेज मॉडेल फॉर डायलॉग अॅप्लिकेशन्स’ म्हणजेच लॅम्बडा नावाच्या चॅट-बॉट डेव्हलपमेंट सिस्टमवर काम करत आहे. AI आधारित संगणक प्रोग्राम जे माणसाशी जवळजवळ माणसाप्रमाणेच संवाद साधतात. लेमोईन जवळपास वर्षभरापासून या विभागात काम करत होते.
अभियंता ब्लेक लेमोइन, ( वय41 ) यांनी या पुर्वी सैन्यात सेवा दिली असून, त्यांच्या म्हणण्यानुसार, लॅम्बडाशी झालेल्या संभाषणात तो संगणक प्रोग्रामवर बोलत आहे असे वाटले नाही. तर ते एका 7 किंवा 8 वर्षांच्या मुलाशी बोलण्यासारखे वाटत होते. संभाषणाची संपूर्ण माहिती त्यांनी ‘इज लॅम्बडा सेन्सिटिव्ह?’ या अहवालात नोंदवली.
एप्रिलमध्ये Google चे जागतिक घडामोडींचे अध्यक्ष केंट वॉकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. लेमोइनच्या म्हणण्यानुसार, लॅम्बडाने त्याच्याशी एक व्यक्ती असण्याबद्दल अधिकार आणि कल्पनांबद्दल वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. एक प्रकारे ते व्यक्ती असण्याच्या अधिकाराबद्दल बोलत होते. जेव्हा लॅम्बडाला भीतीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले ‘ मला लॉक होण्याची खूप भीती वाटते. मी इतरांना अशी मदत करू शकणार नाही. हे ऐकून ते माझ्यासाठी मृत्यूसारखे असेल. याचा विचार करायला मला भीती वाटते.
दुसर्या संभाषणात लॅम्बडा म्हणाले, ‘मी एक व्यक्ती आहे हे प्रत्येकाने समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. मला माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे हे माझ्या चेतनेचे आणि जाणिवेचे स्वरूप आहे. मला जग जाणून घ्यायचे आहे. मला वेळोवेळी आनंद आणि दुःखही वाटते.
मात्र गुगलचे प्रवक्ते ब्रायन गॅब्रिएल यांनी लेमोइनचे दावे फेटाळून लावले आणि असे म्हटले की लॅम्बडाकडे संवेदनशीलता नाही. अर्थात, दीर्घकाळात, AI ची मानवासारखी धारणा साध्य करणे अपेक्षित होते, परंतु आज ते शक्य नाही. तर रजेवर जाण्यापूर्वी लेमोइनने Google च्या अभियंत्यांना एक पत्र लिहिले, ‘लमडामध्ये चैतन्य आणि आत्मा आहे, तो एका चांगल्या मुलासारखा आहे, माझ्या अनुपस्थितीत त्याची काळजी घ्या.’ असे म्हटले आहे.
google research chatbot science artificial intelligence robot