इंडिया दर्पणऑनलाईन डेस्क – काही मालवेअर लोडेड अॅप्सनी Google Play Store वर प्रवेश केला आहे आणि अनेक लोकांनी त्यातील धोका माहित नसल्याने त्यांनी असे अॅप्स डाउनलोडदेखील केले आहेत. यापैकी एक आहे जोकर मालवेअर. जो Android वापरकर्त्यांसाठी धोक्याचा आहे. २०१७ मध्ये पहिल्यांदा हा मालवेअर बघायला मिळाला होता. Android वापरकर्त्यांचे फोन हायजॅक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांमध्ये या मालवेअरचा सर्वाधिक वापर केला जातो.
सायबर सुरक्षा संशोधकांनी जोकर मालवेअर, स्पायवेअर ट्रोजन बद्दल वारंवार इशारा दिला आहे. हे मालवेअर हॅकर्सना इतरांच्या फोनवर हल्ला करू देते आणि त्यांची गोपनीय माहिती मिळवते. हे मालवेअर आता परत काही Google Play Store अॅप्सवर दिसून आले आहे. सायबर सिक्युरिटी रिसर्च फर्म प्राडिओने गुगल प्ले स्टोअरवरील चार अॅप्स, स्मार्ट एसएमएस मेसेजेस, ब्लड प्रेशर मॉनिटर, व्हॉईस लँग्वेज ट्रान्सलेटर आणि क्विक टेक्स्ट एसएमएसमध्ये या जोकर मालवेअर दिसून आले आहे.
रिसर्च टीमने गुगलला याची माहिती दिली असून त्यांनी हे अॅप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. परंतु काढण्याच्या प्रक्रियेपूर्वी, ते आधीच १ लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. याचा अर्थ अनेक युजर्स आधीच अडचणीत आहेत. Googleने ही अॅप्स काढून टाकली आहेत, तरीही एक दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांच्या फोनवर ही अॅप्स आहेत. प्रारंभिक एसएमएस फसवणूक करण्यासाठी जोकर मालवेअरचा वापर करण्यात आला.
हे अॅप्स वन – टाइम पासवर्ड आणि सुरक्षा कोड देखील आपल्या मोबाईलमधून मिळवू शकतात. गोपनीय माहिती मिळवू शकतात. कोणताही पुरावा न ठेवता स्क्रीनशॉट घेऊ शकतात, एसएमएस पाठवू आणि वाचू शकतात आणि कॉल देखील करू शकतात. हा मालवेअर आपल्या डिव्हाइसवर जवळपास सर्वकाही करण्यास सक्षम आहे. सर्व Android वापरकर्त्यांनी त्यांच्या डाउनलोड केलेले असे अॅप्स लगेचच मोबाईलमधून काढून टाकावे. कारण हे अॅप्स हॅकर्सला आपली सगळी माहिती देतात, ज्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो.
Google Play store ban 4 Apps Delete from your mobile