नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अनेक सायबर क्राईममध्ये वाढ झाली आहे. तसेच अनेक गैरप्रकार घडत असल्याने केंद्र सरकारने या संदर्भात कडक धोरण जाहीर केले आहे. नव्या आदेशानुसार प्ले स्टोर वर १६ बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी देखील अनेक वेळा सुमारे ५०, १०० आणि १५० बंदी घालण्यात आली होती. आता प्ले स्टोरवर सुमारे १६ ॲप्सकडून युजर्सच्या मोबाईलमधील बॅटरी आणि डेटाचा अधिक वापर सुरु होता. हे ॲप्स युजर्सच्या मोबाईलची आणि डेटा लवकर संपण्याचे कारण बनले होते. मॅकॅफी या सायबर कंपनीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुगलने ही कारवाई केली आहे.
मॅकॅफी ने दिलेल्या माहितीनुसार, हे ॲप्स गुगल प्ले स्टोरवरून हटविण्यात आले आहेत. हे ॲप्स प्ले प्रोटेक्टसह युजर्सच्या डिव्हाइसवर ब्लॉक करण्यात आले आहेत. गुगलने प्ले स्टोरवरून १६ ॲप्स काढून टाकले आहेत. हे ॲप्स वापरकर्त्यांच्या डिव्हाइसवर अधिक बॅटरीचा वापर आणि अत्यधिक डेटा वापरासाठी कारणीभूत ठरत होते. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया आणि VLC मीडिया प्लेयर यांसारख्या दोन मोठ्या अॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. पण भारतात ब्लॉक केलेल्या सर्व केंद्र सरकारने गुगल प्ले स्टोअर्स आणि अॅप स्टोअर्सवर चीन सरकारचे अॅप्स शोधण्यासाठी एक सक्रिय दृष्टीकोन स्वीकारला होता. सन २०२० ते २०२२ दरम्यान एकूण ३२१ अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती.
मॅकॅफी सिक्युरिटी फर्मच्या अहवालानुसार काही ॲप्स युजर्सच्या मोबाईलची बॅटरी आणि डेटा लवकर संपण्याचं कारण ठरतं होते. या अपमध्ये जाहिरातींवर क्लिक केल्यास दुसरे वेबपेज उघडले जायचे यामुळे युजर्सच्या मोबाईलची बॅटरी आणि डेटा यांचा अधिक वापर होत होता. सिक्युरिटी फर्मने माहिती देत सांगितलं की, या सर्व ॲप्सना प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आले असून एकूण २० कोटी युजर्सनी हे ॲप्स इअन्स्टॉल केले होते.
एका अहवालानुसार, गुगलने प्ले स्टोरवरून गुगल प्ले स्टोरमधून काढलेल्या ॲप्सच्या यादीत Busanbus, Joycode, Currency Converter, High-Speed Camera, Smart Task Manager, Flashlight+, K-Dictionary, Quick Note, Ezdica, Instagram Profile Downloader आणि Easy Notes या ॲप्सचा समावेश आहे.
मॅकॅफीला असे आढळले की, सदर ॲप्स एकदा उघडले की, युजर्सना सूचना न देता वेगळेच वेब पेज उघडले जात होते, त्यानंतर लिंक्स व जाहिरातींवर क्लिक केल्यास त्या जाहिरातींवरील इंगेजमेंट वाढते. युजर्ससोबतची फसवणूक असून फसव्या जाहिरातींचा एक प्रकार आहे. हटवण्यात आलेल्या ॲप्समध्ये ॲडवेअर कोड लायब्ररी com.liveposting आणि com.click.cas हे कोड आहेत. ज्यामुळे ॲप्समध्ये इतर लिंक्स आणि जाहिरातींवर क्लिक करण्याची परवानगी मिळत होती. हे सर्व हे ॲप्स प्ले प्रोटेक्ट सह युजर्सच्या डिव्हाइसवरही ब्लॉक करण्यात आले आहेत.
Google Play Store 16 Dangerous Apps Banned India
Technology